एक्स्प्लोर

कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या साक्षीदार तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडला!

दोन दिवसआधी पूजाच्या कुटुंबीयांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचाराची साक्षीदार पूजा सकट नावाच्या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. कोरेगाव-भीमापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाडा गावातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. दोन दिवसआधी पूजाच्या कुटुंबीयांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारीला हिंसाचार झाला होता. जाळपोळ आणि दगडफेकही झाली होती. या हिंसाचारात पूजा सकटचं घर जाळण्यात आलं होतं. हिंसाचाराच्या त्या घटनेची पूजा साक्षीदार होती. घर जाळल्यानंतर पूजाचं कुटुंब कोरेगाव-भीमापासून जवळच असलेल्या वाडा नावाच्या गावात राहायला गेलं. मात्र वाडा गावात ज्या ठिकाणी हे कुटुंब राहत होतं, तिथल्या जमीन मालकाने काही दिवसांमध्येच घर सोडण्यासाठी तिच्या कुटुंबाच्या मागे लकडा लावला. अकरावीची परीक्षा दिलेली पूजा शनिवारी घरातून नाहीशी झाली. बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली होती. मात्र रविवारी तिचा मृतदेह वाडा गावातील एका विहिरीत आढळून आला. पूजाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर नऊ जणांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पूजा सकटने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी 306 अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पूजा सकटचा मृत्यू संशयास्पद : प्रकाश आंबेडकर कोरेगाव-भीमा प्रकरणाची साक्षीदार आणि तक्रारदार पूजा सकटचा मृत्यू संशयास्पद आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणात पूजा एकमेव तक्रारदार होती. पोलिसांनी आधीच तिच्या एफआयआरवर तपास केलेला नाही. आता तिच्या मृत्यूप्रकरणी तरी पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Court Firing News: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लाची व्याप्ती वाढली; कर्नाटक गाठण्याची तयारीत असलेल्या आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या अकरावर
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लाची व्याप्ती वाढली; कर्नाटक गाठण्याची तयारीत असलेल्या आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या अकरावर
Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जायचं ठरलं, रोहित पवारांच्या कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, चर्चांना उधाण
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जायचं ठरलं, रोहित पवारांच्या कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, चर्चांना उधाण
Devendra Fadnavis On Pune Flex :
"उद्या माझे नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर..."; पुण्यातील कारवाईचं फडणवीसांकडून कौतुक, नेमकं काय म्हणाले सीएम?
Sunetra Pawar: कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Congress on Delimitation Bill 2026 : मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
Sunetra Pawar on Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
Rohit Pawar: तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
Sanjay Raut on Amol Kolhe: अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज,
अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज, "शरद पवारांच्या बेईमान राष्ट्रवादीला महाराष्ट्राची ताकद दाखवू'
Sanjay Raut on Delimitation Bill 2026 : पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
Krishnaraj Mahadik on Abhijeet Dipke : 'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
Sharad Pawar and Gautam Adani: शरद पवार- गौतम अदानींची तब्बल 2 तास भेट, ब्रीच कँडी रुग्णालयात प्रकृतीची विचारपूस, नेमकं काय घडलं?
शरद पवार- गौतम अदानींची तब्बल 2 तास भेट, ब्रीच कँडी रुग्णालयात प्रकृतीची विचारपूस, नेमकं काय घडलं?
Embed widget