एक्स्प्लोर

Pune Crime News: तीन मुलं सुखी संसार; पतीच्या मित्रासोबत जुळले सुत, प्रेमात अडसर नको म्हणून मुलाला संपवलं, बीडमध्ये विल्हेवाट लावताना आईचं बिंग फुटलं!

Pune Crime News: पुण्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे ही घटना घडली. 27 वर्षीय आई बसरिन मेहबूब शेख हिचे आरोपी राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते.

पुणे: ​प्रेमात अडसर ठरेल म्हणून पोटच्या ६ वर्षांच्या मुलाचा आईने जीव (Pune Crime News) घेतला, प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या खेडमध्ये घडली. पुरावे मिटवण्यासाठी आई मृतदेह (Pune Crime News) माहेरी घेऊन गेली. मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्याने (Pune Crime News) झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र मुलाच्या आजोबांना संशय आला, त्यांनी परळी पोलिसांकडे तक्रार केली. मग शवविच्छेदन अहवालात आईचं बिंग फुटलं. (Pune Crime News) 

Pune Crime News: ​नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे ही घटना घडली. 27 वर्षीय आई बसरिन मेहबूब शेख हिचे आरोपी राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात तिचा ६ वर्षांचा मुलगा आवेज मेहबूब शेख हा अडथळा ठरत होता. म्हणून 4 एप्रिलच्या रात्री साडे अकराच्या सुमारास आईने प्रियकराच्या (Pune Crime News)  मदतीने आवेजचा जीव घेतला. बाथरुममधील पाण्याच्या बादलीत डोके बुडवून नंतर डोके भिंतीवर आणि जमिनीवर आपटून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या (Pune Crime News)  केली. ​हत्येनंतर पुरावे मिटवण्यासाठी आरोपींनी या घटनेला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. यासाठी आई आवेजचा मृतदेह माहेरी म्हणजे बीडला घेऊन गेली. हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला असं सांगून अंत्यविधी करण्याचं तिने ठरवलं. आईच्या वडिलांनी पतीच्या कुटुंबियांना अंत्यविधीसाठी बोलवले. त्यावेळी आवेजच्या आजोबांना संशय आला, त्यांनी परळी पोलिसांकडे तक्रार केली आणि शवविच्छेदन अहवालात आईचं आणि प्रियकराचे बिंग फुटले. (Pune Crime News) 

Pune Crime News: गावातील पतीचे मित्र रामच्या संपर्कात ती आली

बसरीन आणि मेहबूब यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना तीन मुलं आहेत. मात्र त्यांच्या संसारात चार वर्षांपूर्वी मिठाचा खडा पडला. त्यानंतर त्यांच्याच गावातील पतीचे मित्र रामच्या संपर्कात ती आली. दरम्यान बसरीन पती पासून दुरावली. दोन मुलं पतीसोबत राहत होती तर बसरीनसोबत आवेज राहत होता. दरम्यान बसरीन आणि रामचे प्रेमसंबंध जुळले. अलीकडे म्हणजे चार महिन्यांपूर्वी बसरीन पुण्याच्या खेड तालुक्यातील कुरळीत एकत्र राहत होते. मात्र मुलगा अडसर ठरेल म्हणून या दोघांनी त्याचा जीव घेतला. आता आईला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात मात्र तिचा प्रियकर फरार झाला आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. (Pune Crime News) 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Embed widget