पुणे : काश्मिरी पत्रकार सफिना नबी (kashmiri journalist safina nabi) यांना पुण्यातील एमआयटी (MIT World Peace University) कॉलेजने जाहीर केलेला पुरस्कार राजकीय दबावापोटी रद्द करण्यात आला आहे. एमआयटीकडून सफीना नबी यांच्या ' हाफ विडो ' या लेख मालिकेला पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. काश्मिर मधील बेपत्ता पुरुषांच्या पत्नींच्या आयुष्यावर ही लेखमाला आधारित आहे. पुरस्कार मिळाल्याचे नबी यांना इ मेल आणि फोन करून सांगण्यात आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी निघण्याची तयारी नबी यांनी केलेली असताना त्यांना एमआयटी कॉलेजकडून राजकीय दबावामुळे तुम्हाला देऊ केलेला पुरस्कार रद्द करावा लागत असल्याच सांगण्यात आलं. काही हिंदूत्ववादी संघटनांनी नबी यांना त्या काश्मिर असल्याने पुरस्कार देण्यास विरोध केला होता. एमआयटी संस्थेचे प्रमुख राहूल कराड यांना याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र राजकीय दबावातून हा पुरस्कार रद्द करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. 


मी पुरस्कारासाठी अर्ज केला नव्हता. मात्र विद्यापीठाच्या मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाने 11 ऑक्टोबरला ई-मेल पाठवला आणि कॉल करून पुरस्कार मला जाहीर झाल्याचे कळवले होते. पुरस्कारासाठी निवड करण्याच्या समितीमध्ये प्रतिष्ठित सात सदस्यीय ज्युरी ज्येष्ठ पत्रकार एम.के. वेणू , व्यंग्यचित्रकार संदीप अध्वर्यू , लेखिका आणि ज्येष्ठ पत्रकार सुनंदा मेहता होते. त्यांनी माझी निवड केल्याचे नमूद केले होते, असं सफिना नबी यांनी 'द वायर'शी बोलताना म्हटलं आहे. मात्र 16 ऑक्टोबरला मला त्यांनी फोन करुन हा मला जाहीर केलेला पुरस्कार रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. त्यामुळे या प्रकारामागे विद्यापीठावर राजकीय दबाव असू शकतो, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


द वायरच्या वृत्तानुसार, सफिना नबी यांनी सांगितलं की, सगळं ठीक होतं आणि आठवडाभर ते प्रवास व्यवस्थेसाठी संपर्कात राहिले. मला 17 ऑक्टोबर रोजी प्रवास करायचा होता आणि 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास मला एका महिलेचा फोन आला जिने स्वतःची विद्यापीठाची फॅकल्टी मेंबर म्हणून ओळख दिली आणि पुरस्कार रद्द झाल्याची माहिती दिली. मी कारण विचारले असता त्यांनी मला हा पुरस्कार देण्यासाठी खूप राजकीय दबाव असल्याचे सांगितले. 



इतर महत्वाची बातमी-


Nilam Gorhe : 'ललित पाटीलने अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला नाही', निलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप