पुणे : पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून  (Sasoon Hospital Drug Racket) अटक केली होती. नाशिकमध्ये रात्री ही कारवाई करण्यात आली होती. अर्चना किरण निकम आणि प्रज्ञा अरुण कांबळे यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. अर्चना किरण निकम आणि प्रज्ञा अरुण कांबळे यांना चार दिवसांची म्हणजेच 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

कोर्टाने नक्की काय म्हटलंय?

चौकशीमध्ये संपूर्ण समाधान झाल्याशिवाय पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. अटक आरोपी ललित पाटील याच्याशी अटक महिला आरोपींचा संबंध असल्याचं केस डायरीत दिसून येत आहे. आरोपींनी ललित पाटील याला 25 लाख रुपयांची मदत केल्याचं रिमांड रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. आतापर्यंत निष्पन्न झालेल्या बाबींवरून आणखी तपास आवश्यक आहे. तपास अधिकाऱ्यांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली मात्र न्यायालय त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावत आहे. 23 ऑक्टोबरला पुन्हा कोर्टात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ललितला केली होती मदत...

ड्रगमाफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईला आले आहे तर दुसरे पथक नाशिकला पोहचले आणि ललित पाटीलच्या दोन मैत्रीणींना अटक केली आहे. या दोघींनी पोलिस आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या तसंच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनींच मदत केल्याचं समोर आलंय. ललित पाटील फरार असताना तो सातत्याने या दौन मैत्रिणींच्या संपर्कात होता तसंच त्याने कमावलेला काळा पैसाही त्याने या दोघींकडे ठेवायला दिला होता. ललित पाटील पुण्यातून पसार झाल्यानंतर प्रेयसी प्रज्ञा कांबळेला भेटायला नाशिकमध्ये आला. त्यानंतर अर्चना निकम या दुसऱ्या मैत्रीणीला देखील तो भेटला या दोघांकडून पैसे घेऊन तो पुढे पसार झाला. ललित पाटील मेफेड्रॉन विक्रीतून मिळणाऱ्या पैशातील काही वाटा या दोघींवर खर्च करत होता. ललित पाटील दोन आठवडे फरार असताना या दोघींच्या सतत संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. 

प्रज्ञा-ललितचे Exclusive फोटो समोर

ललित पाटील आणि प्रज्ञ कांबळेचे काही फोटोदेखील एबीपी माझाच्या हाती लागले आहे. त्यात काही फोटोत ललित सिगारेट ओढताना दिसत आहे तर काही फोटोत प्रज्ञा कांबळेसोबत अतिजवळचे फोटोदेखील समोर आले आहेत आणि हे फोटो ललित ससूनमध्ये उपचार घेत असतानाचे असल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील गॉडफादर नक्की कोण आहे, हे शोधावं लागणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

Lalit patil Macoca : मोठी बातमी! पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; ललित पाटीलसह गॅंगवर मकोका नोंदवण्याच्या तयारीत