Pune Kalyani Nagar Accident News : पुणे कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या रात्री मद्यधुंद होतो, अशी कबुली अल्पवयीन मुलाने पोलीसांच्या तापासात दिली आहे. 19 मे 2024 रोजी कल्याणीनगर येथे भरधाव पोर्शे कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. या वेळी आपण मद्यधुंत अवस्थेत असल्याचे अल्पवयीन आरोपीने कबूल  केले आहे. तसेच अपघाताबद्दल आपल्याला फारसे आठवत नसल्याचेही संबंधित मुलाने पोलीस चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 


एक जून रोजी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीची आईची उपस्थितीत पुणे पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीमध्ये आरोपी अल्पवयीन मुलाने आपण मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याची कबुली दिली. बाल न्याय हक्क मंडळाने 31 मे रोजी पोलिसांना अल्पवयीन आरोपी मुलाची चौकशी करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी रविवारी अल्पवयीन मुलाची चौकशी केली. 


आरोपी मित्रांचीही कबुली - 


अल्पवयीन मुलाच्या मित्रांचाही पुणे पोलिसांनी कसून चौकशी केली. अल्पवयीन मुलाचे दोन्ही मित्र मागील सीटवर बसले होते. अल्पवयीन आरोपी मध्यप्राशन करुन भरधाव कार चालवत होता, अशी माहिती अल्पवयीन आरोपीच्या मित्रांनी पोलिसांना चौकशीदरम्यान दिली आहे, असे सुत्रांनी दिलेल्या माहितीत समोर  आलेय. दरम्यान, कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या दोन्ही मित्रांना पोलीस साक्षीदार कऱणार आहेत. दरम्यान, पुणे पोलिसांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


अग्रवाल कुटुंबच आरोपीच्या पिंजऱ्यात -


पोर्शे कार अपघात प्रकऱणी अग्रवाल कुटुंबच आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. आरोपी अल्पवयीन मुलगा, वडील, आई आणि आजोबा अटकेत आहेत. अल्पवयीन मुलगा सध्या बालसुधारगृहात आहे. त्याला पाच जूनपर्यंत सुधारगृहात ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय. गुन्हात मुलागेच वडील, आई आणि आजोबा अटकेत आहेत. अपघातानंतर चालकाच्या अपहरणाचा कट केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमाब यांना अटक कऱण्यात आली आहे. दोघांनाही न्यायालयीन कोठडी आहे.  शिवानी अग्रवाल यांना पाच जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


आतापर्यंत 10 जणांना अटक 


पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या 17 वर्षाच्या मुलानं दारुच्या नशेत भरधाव वेगानं आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया (27 वर्षे) आणि अश्विनी कोष्टा (वर्षे) यांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये रविवारी सकाळी 2.30 मिनिटांनी हा अपघात झाला होता. पोर्शे गाडीचा वेग इतका भरधाव होता की कोस्टा या 15 फूट दूर फेकल्या गेल्या.  या अपघाताप्रकरणी येरवाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला.  भारतीय दंड संहितानुसार (IPC) 279, 304(a), 337, 338, 427  आणि मोटार वाहन कायदा कलम 184 आणि 119/177 या अंतर्गत अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  विशाल अग्रवाल(50), सुरेंद्रकुमार अग्रवाल, शिवानी अग्रवाल, कोसी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा (25), मॅनेजर सचिन अशोक काटकर (35), ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगले (35), कर्मचारी नितेश धनेश शेवानी (34) आणि मॅनेजर जयेश सतीश गावकर (23), डॉ. अजय तावरे ,  डॉ श्रीहरी हळनोर, घटकांबळे यांना पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणात अटक केलेली आहे.