एक्स्प्लोर

पुण्यातील जैन बोर्डिंगची जागेच्या व्यवहारामध्ये मुरलीधर मोहोळांचा संबंध नाही, कागदपत्रे समोर

Pune Jain Boarding Hostel Dispute : जैन समाजाची जागा ज्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली आहे त्या कंपनीशी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांचा काहीही संबंध नसल्याचं समोर आलं आहे.

पुणे : पुण्यातील जैन समाजाच्या ट्रस्टच्या जागेवरुन (Jain Boarding Hostel) केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आरोप केले. मात्र जैन समाजाची ही जागा ज्या विशाल गोखले या बांधकाम व्यावसायिकाला विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय झाला, त्या गोखले यांच्या सोबत मुरलीधर मोहोळ यांचे आता कोणतेही व्यवसायिक संबंध नसल्याचं कागदपत्रांवर दिसून येतंय‌.

पुण्यातील जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री झाल्याचा आरोप करत जैन समाजाने आंदोलन केलं. पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात जैन बोर्डिंग हाऊस आहे. या बोर्डिंग हाऊसच्या जागेची विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप जैन समाजाने केला. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि दोन बिल्डरांनी मिळून ही जमीन हडपली असल्याचा आरोपही करण्यात आला. माजी खासदार राजू शेट्टींनीही त्यांच्या भाषणावेळी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले.

Murlidhar Mohol : मोहोळांची भागिदारी नाही

दरम्यान, राजू शेट्टींनी आरोप केल्यानंतर एबीपी माझानं या प्रकरणाचा रिअॅलिटी चेक केला. जैन समाजाची जागा विशाल गोखले या बांधकाम व्यावसायिकाला 2025 मध्ये विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय झाला. विशाल गोखले यांच्यासोबत मुरलीधर मोहोळ 2021 पासून व्यवसायिक भागीदार होते. मात्र फेब्रुवारी 2025 ला मुरलीधर मोहोळ हे भागीदारीतून बाहेर पडले होते. सध्या या विशाल गोखलेंसोबत मोहोळ यांचे कोणतेही व्यवासायिक संबंध नसल्याचं कागदपत्रांमधून दिसून येतं.

Jain Boarding Hostel : जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेचा नेमका वाद काय?

पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगर येथे आहे. जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि श्वेतांबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छुक होते. तर समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता.

काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीन विक्रीच्या व्यवहाराशी गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचा संबंध आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Embed widget