पुणे : सध्या चीनसह आशियाई देशात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनूसार जगभरात 88 हजाराहून अधिक लोकांना याचा प्रादुर्भाव झालाय. भारतातील मुंबई-पुण्यासारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्येही याचा धोका आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसच्या संकटाला सामोरं जाण्याची तयारी करण्यात आलीय. सोबतच महापालिकेतर्फे शहरातही कोरोना व्हायरसबद्दल जनजागृती करण्यात येत आहे.


या हॉस्पिटलमध्ये 150 पेक्षा जास्त बेड त्यासाठी सज्ज ठेवण्यात आलेत. जेव्हापासून कोरोना व्हायरसचा धोका निर्माण झालाय तेव्हापासून कोरोना व्हायरसच्या संशयित रूग्णांना या हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येतंय. परदेशातुन प्रवास करुन भारतात येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. इथं भरती केलेल्या रुग्णांची सँपल्स पुण्यातच असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमधे पाठवली जातायत. त्यामुळे चोवीस तासांच्या आत संशयित रुग्ण कोरोना व्हायरसमुळे बाधित आहे की नाही हे समजणे शक्य झालंय.

उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, किम जोंग यांचे गोळ्या घालण्याचे आदेश

ते रुग्ण कोरोनाचे नाही -
पुण्यातील असंख्य लोक परदेशात नोकरीला आहेत. परिणामी कोरोनाचा धोका वाढल्यानंतर त्यांनी देशात परतायला सुरुवात केली. अशातच काही दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्या दोघांना कोरोनाचे संशयित रुग्ण म्हणून नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. या दोघांमध्ये कोरोना व्हायरसची काही लक्षणे दिसल्याचे बोलले जात होते. तपासणीनंतर ते संशयित रुग्ण कोरोनाचे नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ, मात्र संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह

मांसाहार विक्रेतांना फटका -
कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचा फटका चिकन आणि मटण क्षेत्रालाही बसला. आपल्यालाही कोरोना व्हायरस होईल या भीतीने अनेकांनी चिकन, मटण खाणे वर्ज्य केले. परिणामी मागील काही दिवसांपासून या क्षेत्राला करोडो रुपयांचा फटका बसला. परंतु, सरकारने मागील काही दिवसांपासून याविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली असून त्याचे सकारात्मक परीणामही आता पाहण्यास मिळत आहेत. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका चिकन फेस्टिव्हलला नागरिकांनी प्रचंड गर्दी केलीय. या फेस्टिव्हलमध्ये चिकन बिर्याणी आणि चिकनच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलीय. येथील पदार्थ खाण्यासाठी नागरिकांनी तब्बल एक किमीहुन अधिक मोठी रांग लावली होती.

#CoronaVirus | नाशिकमधील कोरोना संशयित निगेटिव्ह, वैद्यकीय चाचणीत कोरोनाची लक्षणं नसल्याचं सिद्ध