एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इन्फोसिसमधील तरुणीच्या हत्येनंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न?
पुणे : 'इन्फोसिस'मधील इंजिनिअर तरुणीला ठार मारणाऱ्या सुरक्षारक्षकाने तिच्या हत्येनंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकटक का बघतोस, याचा जाब विचारल्याच्या रागातून 'इन्फोसिस'मधील इंजिनिअर तरुणी रसिला ओपीची भाबेन सैकियाने हत्या केली होती.
तरुणीची केबलने गळा दाबून हत्या केल्यानंतर आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटच्या क्षणाला विचार बदलल्याचा दावा सुरक्षारक्षकाने पुणे पोलिसांकडे केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र हा आरोपीचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत त्याचा दावा फेटाळून लावला आहे. ही हत्या पूर्वनियोजित असल्याकडे पोलिसांनी लक्ष वेधलं आहे.
हत्येनंतर आपण आसाममध्ये असलेल्या आईला फोन केल्याचंही आरोपी सुरक्षारक्षकाने म्हटलं आहे. हत्येबाबत सांगितल्यानंतर आईने पोलिसांना शरण जाण्याचा सल्ला दिला, त्यामुळे पोलिसांकडे कबुली दिल्याचंही त्याने म्हटलं आहे. पोलिसांनी मात्र त्याच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नसल्याचा उल्लेख केला आहे.
‘एक टक का बघतोस,’ जाब विचारल्याने इन्फोसिसच्या इंजिनिअरची हत्या
सैकिया हत्या प्रकरणाचा आरोपी आहे, तो काहीपण सांगेल, त्याचे दावे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. सैकियाने हत्येनंतर त्याची ड्युटी पूर्ण केली. त्याला सीएसटीला पकडलं, तेव्हा तो आसामला पळून जाण्याच्या तयारीत होता, याकडे पोलिसांनी लक्ष वेधलं आहे.रसिलाच्या हत्येमागे वरिष्ठांचा हात असू शकतो : वडिलांचा दावा
मूळची केरळची असणारी 23 वर्षीय रसिला राजू ओपीची हिंजवडीमधील इन्फोसिसच्या आवारातच रविवारी गळा आवळून हत्या झाली होती. ‘एक टक का बघतोस,’असा जाब विचारल्याच्या रागातून रसिलाची हत्या झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.हिंजवडीत महिला आयटी इंजिनिअरची हत्या, सुरक्षारक्षक ताब्यात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement