मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून पुणे जिह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. पुण्यात राष्ट्रवादीने सर्वाधिक म्हणजे 30 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर प्रमुख विरोधक भाजपला केवळ तीन ठिकाणी सत्ता मिळाली आहे. तर स्थानिक आघाड्यांनी 23 ठिकाणी सत्ता मिळवल्याचं स्पष्ट झालं आहे. थेट सरपंचपदामध्येही राष्ट्रवादीने 30 ठिकाणी विजय मिळवत पहिला क्रमांक कायम ठेवला आहे.  पुण्यातील ग्रामीण भागात अजून राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचं या निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट झालं आहे. 


पुण्यातील 60 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झालं होतं. त्या निवडणुकीचा आज निकाल लागला असून त्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवलं आहे. भाजपने तीन ठिकाणी तर शिवसेनेने दोन ठिकाणी सत्ता मिळवली आहे. शिंदे गटाने यंदाच्या निवडणुकीत खातं खोललं असून दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलं आहे. 


काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही 


पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 60 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली असून यामध्ये काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या आहेत. पुण्यातील सहा ग्रामपंचायती या याधीच बिनविरोध झाल्या आहेत. 


सरपंचपदामध्ये राष्ट्रवादीची आघाडी 


पुण्यातील 61 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी थेट निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक म्हणजे 30 ठिकाणी विजय मिळवला आहे. तर भाजपने तीन ठिकाणी विजय मिळवला आहे. स्थानिक आघाडीने या ठिकाणीही 23 जागांवर विजय मिळवला आहे. 


पुणे जिल्ह्यातील अंतिम आकडेवारी


पुणे जिल्हा 61 ग्रामपंचायत (6 बिनविरोध)


राष्ट्रवादी काँग्रेस - 30
भाजप - 3
शिवसेना - 2
शिंदे गट - 3
काँग्रेस - 00
स्थानिक आघाडी - 23


पुणे जिल्ह्यातील सरपंचपदासाठी निवडणूक निकाल 


राष्ट्रवादी काँग्रेस - 30
भाजप - 3
शिवसेना - 2
शिंदे गट - 3
काँग्रेस - 00
स्थानिक आघाडी - 23