पुणे :  दिवाळी (Diwali 2023) आणि मिठाई हे (Pune News) अगदी अतूट समीकरण. सणासुदीला (Diwali gifts) एकमेकांकडे जातांना आपण भेटवस्तू म्हणूनही मिठाई किंवा गोडाधोडाचं (Mithai) काहीतरी नेतो. त्यातही दिवाळी हा सण खवय्यांसाठी पर्वणीच असतो. फराळाच्या लाडू,चिवडा,चकली,अनारशांसह काजू कतली,सोनपापडी, गुलाबजाम (GulabJam),आंबा बर्फी (mango burfi) असे अनेक पर्याय खवय्यांसाठी उपलब्ध असतात. मागच्या वर्षी प्रमाणेच यंदाही खवय्यांच्या पर्यायात भर टाकणारी आणि तोंडाला पाणी सुटेल, अशी शाही मिठाई यंदाही चितळे बंधू मिठाईवाले घेऊन आले आहेत. ती म्हणजे, खास 'सुवर्ण मिठाई.' 


चितळे बंधु मिठाईवाले (Chitalebandhu Mithaiwale) यांची काजु कतली, आंबा बर्फी, बदाम बर्फी,पिस्ता बर्फी आणि वेगवेगळ्या चवीच्या सोनपापडी हे ग्राहकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर यंदाही चितळेंनी सणासुदीनिमित्त खास ‘सुवर्ण मिठाई’ तयार केली आहे. सोन्याचे आवरण असणारी ही मिठाई चितळेंच्या पुण्यातील सर्व स्टोअर्सवर काही प्रमाणातच उपलब्ध आहे. परंतु ही मिठाई फक्त ऑर्डरनुसार तयार करुन दिली जाईल. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असलात तरी ही 'सुवर्ण मिठाई' ऑर्डर करु शकता. सणासुदीनिमित्त खास ही आगळीवेगळी मिठाई मागील वर्षीप्रमाणेच यंदाही सर्व खवय्यांसाठी नक्कीच विशेष आकर्षण ठरणार आहे.


दिवाळीच्या काळात सर्वत्र पसरलेला उत्साह, गजबजलेल्या बाजारपेठा असे अत्यंत सुखकारी आणि मांगल्यमयी वातावरण आहे. या वातावरणात मिठाई हा खवय्यांसाठी खास आकर्षणाचा विषय आहे. फराळाचे विविध प्रकार, मिठाई, सुकामेवा असे नानाविध प्रकार आपल्याला बाजारपेठात दिसतात. आता त्यात ‘सुवर्ण मिठाई’ या अतिशय आकर्षक प्रकाराची भर पडली असून खवय्यांना ती नक्की आवडेल, असा विश्वास चितळे बंधू मिठाईवाले यांनी व्यक्त केला.


 दिवाळीत सगळ्यात आकर्षण असतं ते म्हणजे फराळ आणि मिठाईचं. त्यात अनेक प्रकारच्या मिठाई तयार केल्या जातात. लाडूंचेदेखील वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या, चिवडा आणि बर्फीदेखील खवय्यांना आकर्षित करत असतात. त्यात आता सध्या सुवर्ण मिठाईचा ट्रेंड सुरु आहे. अनेकांना गिफ्ट देण्यासाठी सध्या बाजारात नवनवे गिफ्ट उपलब्ध आहे. त्यात सगळ्यांची पसंती ही चविष्ठ मिठायांना दिली जाते. यात पुणेकर सध्या सुवर्ण मिठाईला पसंती देताना दिसत आहे. 


किंमत किती?


छोटा बॉक्स 1600 रुपये.
मोठा बॉक्स- 6000 रुपये.


इतर महत्वाची बातमी-


Kunbi Certificate In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातही कुणबी नोंदी सापडल्या; या दोन तालुक्यात सर्वाधिक दाखले मिळाले, मराठवाड्यापेक्षा जास्त नोंदी मिळण्याचा अंदाज!