पुणे :पुण्यात गणेशोत्सवाची तयारी(ganeshotsav 2023) जोरात सुरु आहे. त्यात अनेक गणेश मंडळांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. देखावे आणि देशातील वेगवेगळ्या मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी हलत्या देखाव्यांवर आणि बाकी देखाव्यांवर शेवटचा हात फिरवला जात आहे. त्यातच राज्याच्या सरकारमधील काही नेते यंदा पुण्यातील देखाव्यामध्ये पाहायला मिळणार आहे. राजकीय आखाड्याचा देखावा पुण्यात दिसणार आहे. राजकीय घडामोडी आणि संघर्ष या देखाव्यांमधून दाखवण्यात येणार आहे. पुण्यातदेखील  पुण्याचे प्रसिद्ध कलाकार सतीश तारु यांच्या स्टुडियोत हा देखावा तयार केला जात आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत. 



मागील वर्षी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाचा देखावा साकारण्यात आला होता. यावर्षी अजित पवारांच्या बंदाडादेखावा साकारण्यात येणार का? हे पाहावं लागणार आहे. कारण तारुंच्या या स्टुडिओत राज्यातील प्रमुख नेत्यांच्या  हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. या प्रतिकृतींचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. 


देखाव्यांवरुन पुण्यातील गणेश मंडळांमध्ये मोठी स्पर्धा


दरवर्षी देखाव्यांवरुन पुण्यातील गणेश मंडळांमध्ये मोठी स्पर्धा बघायला मिळते. नवं आणि आकर्षित करणाऱ्या देखाव्याकडे गणेश मंडळांचा कल असतो. त्यात सध्या सुरु असलेल्या विविध घडामोडींवर देखावा साकारण्यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. यंदा कोणता देखावा साकारवा? यासाठी अनेक महिन्यापासून गणेश मंडळाची तयारी सुरु असते. अफझल खानाचा वध, शिवरायांचा प्रताप, शिवराज्याभिषेक सोहळा यांसारखे देखावे भाविकांचं लक्ष वेधून घेतात. मात्र यावर्षी सत्तासंघर्षाचा देखावा लक्ष वेधून घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे कोणताही राजकीय वाद सुरु होणार का? असा प्रश्नदेखील अनेकांना पडला आहे. मात्र या देखाव्यात नेमकं गुवाहाटीचं बंड असणार कि अजून काही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे


देखाव्यासाठी प्रसिद्ध पुणे


पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी लाखो रुपये खर्चकरुन पुण्यातील गणेश मंडळ जिवंत देखावे आणि देशातील विविध देवांची मंदिरं साकारण्याचा प्रयत्न करतात. हे सगळे देखावे पाहण्यासाठी आजूबाजूच्या शहरातील नागरीकसुद्धा पुण्यात गर्दी करतात. राजाराम मंडळात दरवर्षी देशातील महत्वाच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येते. यंदा हे मंडळ शेगावच्या गजानन मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-