एक्स्प्लोर

Pune Ganeshotsav 2023 : अखेर तब्बल 28 तासांनी पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक संपली, कोणामुळे खोळंबली मिरवणूक, पोलीस काय म्हणाले?

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक तब्बल 28  तास 40 मिनिटांनी अखेर संपली.बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…या जयघोषात पुण्यातील शेवटच्या गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झालं.

पुणे : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक तब्बल 28 तास 40 मिनिटांनी अखेर संपली. शेवटच्या उंबऱ्या गणपती मंडळाच्या विसर्जनाने ही मिरवणूक संपली. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…या जयघोषात पुण्यातील शेवटच्या गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले. 28 तास सगळ्या गणेश भक्तांचा उत्साह कायम असल्याचं पाहायला मिळालं. मानाचे गणपती, दगडूशेठ गणपती यांचं वेळेत विसर्जन पार पडलं. मात्र पुण्यातील महत्वाच्या गणपती मंडळांनी उशीर केल्याने यंदा मिरवणूक खोळंबली. लवकर मिरवणूक संपवण्याचा दावा मात्र फोल ठरला. 

का लांबली मिरवणूक?

पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर पार पडावी यासाठी यावर्षी पुणे पोलिस आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पदाधिकाऱ्यांकडून दगडूशेठने मिरवणुकीत लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार साडेचार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या दगडूशेठचे नऊ वाजण्याच्या आत विसर्जन देखील झाले. मात्र, त्यानंतर अखिल मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजराम यासारख्या मंडळांची मिरवणूक बराच वेळ सुरूच होऊ शकली नाही. कारण दगडूशेठ नंतर या मंडळांएवजी इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी प्रवेश देण्यात आला. या मोठ्या मंडळांची विसर्जन मिरवणूक दीड वाजल्यानंतर देखील सुरुच झाली नाही. 

पोलिस काय म्हणाले?

सर्वांच्या सहकार्याने विसर्जन मिरवणूक लवकर आणि शांततेत पार पडली. साधारण 2905 गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला. पुढील वर्षी अजून विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी करता येईल, दगडूशेठ गणपती मंडळाने 4 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू करण्याचा निर्णय घेतला तो कौतुकास्पद आहे. मात्र याच मिरवणूकीत काहीसं गालबोट लागलं. सहकार नगर राड्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, असं  पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी म्हटलं आहे.

अनंत चतुर्दशीला सकाळी 10 वाजला मिरवणुकीला सुरुवात झाली होती. दिवसभर पुण्यातील मध्यवर्ती भागात मिरवणुकीचा जल्लोष बघायला मिळाला. सगळ्या रस्त्यांवर मिरवणुकीची धामधुम बघायला मिळाली. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारात मानाच्या पाचही गणपतीचं प्रथेप्रमाणे विसर्जन करण्यात आलं. 

दगडूशेठ गणपती मंडळाने करुन दाखवलं

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने यंदा पहिल्यांदाच 4 वाजता मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी नियोजन केलं होतं. दरवर्षी दगडूशेठ गणपतीमुळे विसर्जन मिरवणूक लांबते असं बोललं जातं होतं. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी चार वाजता मिरवणुकीला सुरुवात केली आणि भर पावसात, जल्लोषात रात्री पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री 8.50 वाजता दगडूशेठ गणपती मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले. 

इतर महत्वाची बातमी-

Pune ganeshotsav 2023 : पुण्यात पोलिसांचा वचक नाहीच? गणेश मंडळांचा मनमानी कारभार सुरुच; तब्बल 22 उलटूनही 200 पेक्षा जास्त मूर्तींचं विसर्जन बाकी

महत्त्वाच्या बातम्या

'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget