Pune Flood Situation: पुण्यात (Pune Rain) सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) नागरीकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसत आहेत. काही भागात प्रशासनाची मदत होत आहे. मात्र, काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढत असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. पुण्यातील सिंहगड परिसरातील निंबजनगर भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर नागरिक अडकून पडले आहेत. तर निंबजनगर परिसरातील काही गाड्यांमध्ये काही नागरिक अडकून पडले होते. गाड्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढल्याने गाड्या अडकून पडल्या. त्या गाड्यामध्ये काही जण अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. 


गाडीची काच फोडून काढलं


पाण्याचा प्रवाह वाढल्याने अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. त्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. गाडीच्या काचा फोडून त्या नागरिकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. रस्त्यावर, सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. लहान मुले, महिला, नागरिकांनी त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात येत आहे. 


खडकवासला धरणातून 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने मुठा नदीला पूर (Pune Heavy Rain) आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पूलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाळी आहे.


मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पुण्यातील एकता नगर परिसरात ठातीपर्यंत पाणी साचलं आहे. पुण्यात एकता नगर परिसरात बोटीद्वारे बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. परिसरात पाण्याची पातळी वाढत चालली आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने बोटीद्वारे बचावकार्य करण्याच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले आहेत. शेकडो लोक एकता नगर भागात अडकले आहेत. पाणी मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. 


पुण्यातील सिंहगड परिसरातील निंबजनगर येथे मोठ्या प्रमाणावर लोक अडकले होते. याठिकाणी प्रशासन पोहोचलेलं नव्हतं. एबीपी माझाने याबाबचे वृत्त दाखवल्यानंतर आता बचावकार्य सुरू झाले आहे. अनेक जण आपल्या घरामध्ये अडकून पडले आहेत. अद्याप मुसळधार पाऊस कोसळत आहे. 


मुळशी धरणातून दुपारी २ वाजता धरणाच्या सांडव्यावरून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार


मुळशी धरण परिसरात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे धरण जलाशय सकाळी ७ वा. ७० टक्के क्षमतेने भरलेले होते. आज दुपारी २ वाजता धरणाच्या सांडव्यावरून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.