पुणे : पुण्यातील मार्केट यार्ड (Pune Market Yard Fire)  परिसरात मध्यरात्री एका हॉटेलमध्ये आग लागली. यामध्ये दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एका कामगावर रुग्णालयात उपचार सुरू आहे मार्कटयार्ड मधील गेट नंबर 1 इथं रेवणसिद्ध नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली. मुन्ना राठोड आणि संदीप या दोन कामगारांचा आगीत मृत्यू झाला. 


दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू 


मार्केटयार्ड परिसरातील  दोन मजले असणाऱ्या इमारतीत हॉटेलमध्ये आग लागली होती. शटर आतमधून कुलपाने बंद असून तीन कामगार पोटमाळ्यावर अडकले होते.  जवानांनी तातडीने बोल्डकटर या अग्निशमन उपकरणाने शटर तोडून आतमध्ये पोटमाळ्यावर प्रवेश केला आणि आगीवर पाण्याचा मारा केला.  आगीमध्ये अडकलेल्या तीन कामगारांना जखमी व बेशुद्ध अवस्थेत तत्परतेने बाहेर काढून शासकीय रुग्णवाहिका क्रमांक 108 मधून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र दोन कामगारांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून अद्याप  आगीचे कारण समजले नाही.


मोठा अनर्थ टळला 


आग तळमजल्यावरील भटारखान्यातून सुरू झाली व मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वात आधी आग आणखी पसरु नये यासाठी दक्षता घेतली. सर्वात प्रथम हॉटेलमध्ये असलेले 4 सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मध्यरात्री  1 वाजून 8 मिनिटानी  अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात मार्केटयार्ड, गेट नंबर एक, हॉटेल रेवळ सिद्धी येथे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळली. माहिती मिळताच  गंगाधाम, कोंढवा खुर्द आणि मुख्यालयातून एक फायरगाडी व जम्बो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.  


आगीच्या घटनेत वाढ (Pune Fire News) 


पुण्यात मागील काही महिन्यांपासून आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. पुण्यात काही दिवसापूर्वी टिंबर मार्केट आणि मार्केटयार्डमधील गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली या आगीत मोठं नुकसान झाले. पाच मोठी गोडाऊन डोळ्यादेखत  खाक झाली. सुमार पाच तास आग आटोक्यात येत नव्हती.  अनेकांच्या घरात नुसता धूर दिसत होता.  मागील अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या 8 कुटुंबाच्या दाणादाण झाला आहे. घरातील सगळं सामान विखुरलेल्या अवस्थेत आहे. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही 


हे ही वाचा :     


...अन् हवाई दलाच्या मदतीनं मध्यप्रदेश सरकारच्या सातपुडा भवनातील आग आटोक्यात; चौकशीसाठी समिती गठित