पुणे : पुण्यात (Pune) आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान पुण्यातील वेस्टएंड मॉलमध्ये (Westend Mall) काल रात्री मोठी आग लागली होती. मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या मदतीने मॉलमध्ये असणाऱ्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. पुण्यातील औंध भागात असलेल्या वेस्टएंड मॉल आहे.
घटनास्थळी मॉलच्या एक्झॉस्ट डक्टमधे आग लागल्याचे दिसून येताच अग्निशमन दलाचे जवान यांनी तिसऱ्या मजल्यावर जाऊन एक्झॉस्ट ब्लोअरचा पञ्याला फायर एक्स आणि कटावणीच्या साह्याने मोठे छिद्र करुन मॉलमधील सुरू असणाऱ्या स्थायी अग्निशमन यंञणेचा वापर करत पाणी मारुन आग पुर्ण विझवली. घटनेच्या वेळी उपस्थित नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. ही आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून वेळीच आगीवर नियंञण मिळवल्याने मोठा धोका टळला.
या संपूर्ण घटनेत अग्निशमन दलाच्या जवानांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. यात आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी वेस्ट एंडमॉलजवळ पोहचले. त्यानंतर त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पाण्याचा मारा सुरु केला. पुणेयातील वेस्ट एंड मॉल हा मोठा मॉल आहे. रोज शेकडो लोक या मॉलमध्ये येत असतात हे पाहून जवानांनी सगळ्या गोष्टींची खबरदारी घेतली आणि मॉलमधील नागरिकांना बाहेर काढलं. त्यांच्या या कार्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी
पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी बजावली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील अग्निशमन दलातील जवान हर्षद येवले यांनी देखील कुटुंबीयांना जत्रेला घेऊन जात असताना रस्त्यावर पेट घेत असलेली गाडी पाहिली आणि जीवाची तमा न बाळगता कुटुंबीयांना सोबत घेत गाडीची आग विझवली होती. त्यांनी कुटुंबीय सोबत असताना आणि महत्त्वाचं म्हणजे सुट्टीवर असताना केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक झालं होतं. पुण्यातील उंड्री परिसरात रात्री एका चालत्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. त्यावेळी ऑफ-ड्युटी असलेला अग्निशमन दलाचा जवान मदतीसाठी आला. पेटलेली गाडी पाहून त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी केली. मग धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुन बीएमडब्ल्यु-एक्सवन या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता.
इतर महत्वाची बातमी-