पुणे: पुणे शहरात 13 ते 17 डिसेंबर या कालावधीत (Sawai Gandharva Mahotsav Pune 2023) आयोजित 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी 16 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यासाठी सवलतीचे 15 दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी 14 दिवस सवलत देण्यात आली असून शिल्लक राहिलेला 1 दिवस आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या विनंतीवरून 16 डिसेंबर रोजी ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास परवानगी देण्यात येत आहे. ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा. ध्वनीचे शोषण करणारे विशिष्ट लाकडी सामुग्री आवश्यक त्या ठिकाणी लावावी. क्षेत्राप्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेऊ नये तसेच शांतता क्षेत्रात ही सूट लागू नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कलाकारांची पुणेकरांना आतुरता...
यंदाच्या महोत्सवात नेमके कोणत्या दिग्गज कलाकारांचं गायन आणि वादन होणार आहे. यासंदर्भात अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरांची चांगली मैफिल रंगणार आहे. अनेक संगीतप्रेमी पुणेकर या महोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. येत्या काही दिवसातच कलाकारांच्या नावांचीदेखील घोषणा होणार आहे. हे कलाकार कोण असणार आहे, याची आता पुणेकरांना अतुरता आहे.
सर्व सुविधा उपलब्ध
महोत्सवासाठी येणाऱ्या रसिकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांसाठी सुसज्ज पार्किंग, कार्यक्रमाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता यावा यासाठी नेहमीप्रमाणे मोठ्या एलईडी स्क्रीन्स, अल्पोपहाराची सोय असणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आदी सुविधा महोत्सवाच्या ठिकाणी असणार आहेत. शिवाय मंडपाच्या एका बाजूस संगीत क्षेत्राशी संबंधित विविध उत्पादनांचे तर एका बाजूला प्रायोजकांचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. पुरुष आणि महिलांसाठी प्रसाधनगृह मंडपाच्या मागील बाजूस उभारण्यात येणार आहे.
यंदा नवीन काय?
मागील वर्षीमहोत्सवात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी साजरी झाली होती. याचाच एक भाग म्हणून जुन्या जमान्यातील नामवंत प्रकाशचित्रकार वा. ना. भट यांनी पं. भीमसेनजींच्या तरुणपणी काढलेले तब्बल 18 फूट उंचीचे व्यक्तीचित्र रसिकांना पहायला मिळाले होते. त्यामुळे यंदा काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-