एक्स्प्लोर

Fire Brigade : जत्रेला जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानाने रस्त्यात पेटती कार पहिली; जीवाची तमा न बाळगता आग विझवली, जवानाचं सर्वत्र कौतुक

पुण्यातील अग्निशमन दलातील  जवान हर्षद येवले यांनीदेखील कुटुंबियांना जत्रेला घेऊन जात असताना रस्त्यावर पेट घेत असलेली गाडी पाहिली आणि जीवाची तमा न बाळगता कुटुंबियांना सोबत घेत गाडीची आग विजवली.

Fire Brigade : अग्निशमन दलाच्या जवानांना देवदूत (Fire Brigade) म्हणून कायम संबोधलं जातं. पुण्यातील अग्निशमन दलातील जवान हर्षद येवले यांनी देखील कुटुंबियांना जत्रेला घेऊन जात असताना रस्त्यावर पेट घेत असलेली गाडी पाहिली आणि जीवाची तमा न बाळगता कुटुंबियांना सोबत घेत गाडीची आग विझवली. त्यांनी कुटुंबीय सोबत असताना आणि महत्त्वाचं म्हणजे सुट्टीवर असताना केलेल्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

पुण्यातील उंड्री परिसरात मंगळवारी (11 एप्रिल) रात्री एका चालत्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. त्यावेळी ऑफ-ड्युटी असलेला अग्निशमन दलाचा जवान मदतीसाठी आला. पेटलेली गाडी पाहून त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी केली. मग धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुन बीएमडब्ल्यु-एक्सवन या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे अग्निशमन वाहन पोहोचताच जवानांनी पाण्याचा मारा करत आग पूर्ण विझवली. अग्निशमन दलाचे कार्य पार पडताच उपस्थित नागरिकांनी आणि कुटुंबीय यांनी जवान हर्षद येवले आणि इतर जवानांचे ही कौतुक केले. या कामगिरीत देवदूत जवान हर्षद येवले तसेच कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक बाबुराव जाधव, अक्षय खरात व तांडेल सोपान कांबळे आणि जवान अभिजित थळकर, अर्जुन यादव, साहिल पडये, अनिल चव्हाण यांनी सहभाग घेतला.

अग्निशमन दलाचे जवान ठरले देवदूत!

पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी बजावली आहे. यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानाने जीवनदान दिले होते. राहत्या घरात तरुण आत्महत्येचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांनी लगेच अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिली होती. जवान तातडीने घटनास्थळी हजर झाले आणि घराचं दार फोडत तरुणाची सुटका केली. ही घटना पुण्यातील श्रद्धा अपार्टमेंट, वडगाव बुद्रुक सिंहगड रस्त्यावर रात्री अकराच्या सुमारास घडली होती. या घटनेत तरुणाला जीवनदान दिल्याने अग्निशमन दलाच्या जवानांचं सगळीकडे कौतुक करण्यात आलं होतं. घटनास्थळी पोहोचताच अधिकारी आणि जवानांनी लगेचच पोलिसांकडून माहिती घेत बचावकार्यास सुरुवात केली होती. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घरामध्ये तरुणाचा ओरडण्याचा आवाज येत होता. हा प्रकार घडत असताना जवानांनी मुख्य लाकडी दरवाजा आणि लोखंडी दरवाजा याला बोल्ड कटरने तोडून आत प्रवेश केला. स्वयंपाक घरामध्ये तरुण पंखा आणि गळ्यामधे नायलॉनची दोरी अडकवून एका लाकडी स्टुलवर उभा असलेला दिसला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
Pune News: वडिलांना डब्बा दिला, घरी जातोय सांगितलं; पाच दिवसांपासून बेपत्ता, अंगावर जखमा नाहीत, मग मृत्यू कसा झाला? सारसबागेजवळील कारमधील मृत तरूणाच्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
वडिलांना डब्बा दिला, घरी जातोय सांगितलं; पाच दिवसांपासून बेपत्ता, अंगावर जखमा नाहीत, मग मृत्यू कसा झाला? सारसबागेजवळील कारमधील मृत तरूणाच्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
Ravindra Dhangekar: राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
Azam Khan: आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video
Video: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले
Embed widget