पुणे : श्रावण महिन्यात तुम्ही घरात एखादी पूजा घालणार असाल तर सतर्क राहा. कारण, पूजा करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी एका घरातून पैसे पळवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.


बिबवेवाडीतल्या एका सोसायटीत काल रात्री पुजाऱ्याच्या वेशात दोन जण शिरले. सोसायटीतल्या लोकांकडून त्यांनी दान-दक्षिणाही गोळा केली. त्यानंतर एका वृद्ध महिलेच्या घरात दोघं जण पुजेच्या बहाण्याने शिरले. घरात वृद्ध महिला एकटीच असल्याचं पाहून दोघांनी त्यांची पर्स घेऊन पळ काढला.

मात्र महिलेने आरडाओरड केल्याने पर्स टाकून दोन्ही चोरटे पसार झाले. पुजाऱ्याच्या वेशात आलेले हे दोघे सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

दरम्यान, या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस दोघांचा शोध घेत आहेत. पण पूजा किंवा ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने कोणी आल्यास नागरिकांनी सावध राहावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

पाहा व्हिडीओ