काश्मीरच्या कारगील भागात असलेल्या माऊंट नूनवर चढाई करण्यासाठी दिल्लीतल्या अल्पाईन वंडर्स या संस्थेबरोबर पुण्याचे काही गिर्यारोहक गेले होते. माऊंट नून हे 7132 मीटर उंचीचं शिखर आहे. त्यावर चढाई करताना कॅम्प 3 इथे सुभाष टकले यांना श्वसनाचा त्रास सुरु झाला आणि तिथेच त्यांचं निधन झालं.
श्वसनाचा त्रास सुरु झाला आणि दमणूक झाली तेव्हा टकले यांनी चढाई थांबवली असती तर हा अनर्थ टळला असता असं मत पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या उमेश झिरपेंनी व्यक्त केलं.
सध्या त्यांचा मृतदेह परत आणण्यासाठी गिरीप्रेमीचे प्रयत्न सुरु आहेत.
सुभाष टकले अनेक वर्ष अशा मोहिमा करत होते. माऊंट आयलंडसारखी मोहिम ही त्यांनी गेल्या वर्षीच पूर्ण केली होती. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर आपल्या शरिराची कुवत ओळखा, कुठे थांबायचंय ते शरीर सांगतं, ते ओळखायला शिका असा सल्लाही झिरपे यांनी नवख्या ट्रेकर्सना दिला आहे.