पुणे : पुण्यातील लोक कधी काय करतील याचा नेम नाही. भोर (Bhor) तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्याच्या (Farmer story) परिसरात राहणाऱ्या जंगम कुटुंबियांनी (Success Story) शेतीच्या कामासाठी थेट ट्रॅक्टर रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात नेला आहे. या किल्ल्यावर चढाई करण्यासाठी पायवाट आहे तरीही जंगम कुटुंबियांनी 4 हजार 694 फूट उंचीवर नेला आहे. पारंपरिक शेतीला अधुनिक जोड देण्यासाठी त्यांना ट्रॅक्टरची गरज होती मात्र रायरेश्वर किल्ल्यावर ट्रॅक्टर जाणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी ट्रॅक्टरचे भाग वेगळे केले आणि एक एक भाग सगळ्यांनी उचलून किल्ल्यावर नेले. इतिहासात पहिल्यांदाच 4 हजार 694 फूट उंची असणाऱ्या रायरेश्वर किल्ल्यावर अशा प्रकारे ट्रॅक्टर नेण्यात आला आहे. हा ट्रॅक्टर नेण्यासाठी दोन दिवस लागले आहेत. परिसरात सध्या याची चांगलीच चर्चा आहे.
पुण्याच्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ला परिसरात पसरलेल्या 16 किलोमीटरच्या विस्तीर्ण पठारावर राहणारे जंगम कुटुंब करत असलेल्या शेतीसाठी, सोय व्हावी म्हणून, किल्ल्यावरील अशोक जंगम आणि रविंद्र जंगम या दोघा शेतकरी भावांनी ट्रॅक्टर थेट 4 हजार 694 फूट उंचीवर नेला आहे. या पठारावर राहणाऱ्या या जंगम कुटुंबांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. इतके दिवस पारंपरिक पद्धतीने मशागत करत शेती केली जात होती. मात्र शेतीला आधुनिकतेची जोड मिळावी आणि शेतकऱ्यांना शेती करणे सोप्प जावं यासाठी अशोक आणि रवींद्र या दोघा भावांनी हा निर्णय घेतला.
ट्रॅक्टर किल्ल्यावर कसा नेला?
टायर, इंजिन, मडगार्ड असे पार्ट ट्रॅक्टर पासून वेगळे करत, एकेक करून वेगळे केलेले पार्ट किल्ल्यावरील अवघड लोखंडी जिना आणि कड्याकपाऱ्या पार करत 20 ते 25 ग्रामस्थांच्या मदतीने खांद्यावर उचलून दोन दिवसाच्या अथक परिश्रमातून किल्ल्यावर पोहचवलेत. किल्ल्यावर पुन्हा हे पार्ट जोडून ट्रॅक्टर सुरू केला.
गावकऱ्यांची मदत...
शेतीसाठी ट्रॅक्टर लागतो. मात्र गाव उंचावर आहे. त्यात गावात जायला पायवाट आहे. रायरेश्वर किल्याच्या परिसरात मोठ मोठे डोंगर आहेत याच डोंगराच्या पठारावर आमची शेती आहे. शेतीसाठी ट्रॅक्टर लागतो. मात्र हा ट्रॅक्टवर एवढ्या उंचावर नेणार कसा हा प्रश्न होता. त्यावेळी आपण ट्रॅक्टरचे भाग वेगळे करुन नेऊ आणि नंतर ट्रॅक्टरचे भाग एकत्र जोडू, असं सुचलं. त्या प्रमाणे संपूर्ण किल्ला चढत हा ट्रॅक्टर आम्ही वर नेला आहे. त्यासाठी गावकऱ्यांची मोठी मदत झाल्याचं जंगम कुटुंबीय सांगतात.
इतर महत्वाची बातमी-
soybean : सरकार प्रसन्न होणार का? शेतकऱ्यांनी केली महाआरती; सोयाबीन उत्पादक शेतकरी आक्रमक