एक्स्प्लोर

पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळचं निलंबन, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

पुणे: 25 लाखाची खंडणी मागणाऱ्या पुण्यातील पोलीस निरिक्षक धनंजय धुमाळला वाचवण्याचा प्रयत्न अखेर अयशस्वी ठरला आहे. कारण एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्यावर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी धुमाळचं निलंबन केलं आहे.   बाणेरमधील सहा गुंठे जागेवरुन संदीप जाधव आणि इतर दोघांमध्ये वाद होता. त्यावरुन जाधव यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल होती. त्यामुळं कारवाई टाळण्यासाठी धनंजय धुमाळनं 25 लाखाची खंडणी मागितली होती. ज्याचं स्टिंग ऑपरेशन संदीप जाधवनं केलं. याची तक्रार पोलीस आय़ुक्तांकडे केल्यानंतर शुक्लांनी फक्त धुमाळची बदली करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.   गेले 3 दिवस धुमाळला वाचवणाऱ्या शुक्लांवरही कारवाई करा अशी मागणी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे संदीप जाधव यांच्यानंतर बांधकाम व्यावसायिक अजय चौधरी आणि रविंद्र बऱ्हाटेंनीही धुमाळनं पैशांसाठी धमकावल्याचा आरोप केला आहे.   काय आहे नेमकं प्रकरण:   बाणेरमधील सर्व्हे नंबर 90 मध्ये बांधकाम व्यावसायिक संदीप जाधव आणि त्याच्या भागीदारानं जमीन विकत घेतली. पण त्यावरुन वाद सुरु झाला. प्रकरण पोलीस ठाण्यात आलं. त्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळनं संदीप जाधवला मोक्का आणि इतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन 25 लाखाची खंडणी मागितली. ती सुद्धा पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावानं.   खरंतर स्टँडर्ड प्रोसिजरप्रमाणं संदीप जाधवच्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मात्र तसं झालं नाही. उलट रश्मी शुक्ला यांनी धनंजय धुमाळची नियंत्रण कक्षाला बदली करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.   संदीप जाधव आणि हेमंत गांधींनी 80 लाख रुपये स्टँप ड्युटी भरुन बाणेरमधील 15 गुंठे जमीन संजय मुथा यांच्याकडून विकत घेतली.   मात्र संजय वाघमारे आणि राजेंद्र चांदेरे यांनी बाणेरमधील जागा आपली असल्याचा दावा करत न्यायालय गाठलं. दरम्यान मार्च 2016 मध्ये संजय मुथा आणि संदीप जाधव यांच्यातही वाद झाले.  मुथा यांनी चतृ:श्रुंगी पोलिसात जाधव आणि गांधींविरोधात तक्रार दिली. त्यानंतर 30 मे रोजी एटीएसमध्ये काम करणाऱ्या धनंजय धुमाळ यांनी संदीप जाधवला समन्स बजावलं.   खरंतर एटीएसचा आणि जमीन प्रकरणाचा संबंध नसतानाही रश्मी शुक्लांनी हे प्रकरण तपासासाठी धनंजय धुमाळकडे दिलं.   एटीएसमध्ये असलेल्या धुमाळकडे प्रकरण सोपवल्यानंतर अडचण येऊ नये म्हणून रश्मी शुक्लांनी धुमाळची बदलीही प्रॉपर्टी सेलला केली आणि त्यानंतर मॅडमना 25 लाख रुपये द्यावे लागतील असं सांगून धुमाळ धमकावत राहिला.   संबंधित बातम्या:  

धुमाळविरुद्ध आणखी एका बिल्डरची तक्रार, रश्मी शुक्लांची गुपचिळी

पुणे पोलीस आयुक्तांच्या नावे खंडणी; पोलीस निरीक्षकाची फक्त बदली

 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar : महाराष्ट्र हळहळला, डोळे पाणावले! नाना पाटेकर अनंतात विलीन, डोणजे गावात भावपूर्ण वातावरणात 'नटसम्राटा'ला शेवटचा निरोप
महाराष्ट्र हळहळला, डोळे पाणावले! नाना पाटेकर अनंतात विलीन, डोणजे गावात भावपूर्ण वातावरणात 'नटसम्राटा'ला शेवटचा निरोप
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Embed widget