पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या (Pune News) दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची रेलचेल असते. यासाठी वाहनांची आगाऊ नोंदणी (Vehicle) मोठ्या संख्येने झाली आहे. यावर्षी नवरात्रोत्सवात 15 ते 24 ऑक्टोबरदरम्यान 10,872 वाहनांची खरेदी झाली आहे. पुण्यात मागील वर्षीच्या तुलनेत (Pune RTO) यावर्षी वाहनांची विक्री वाढली आहे. मागील वर्षी पुण्यात 9,051 वाहनांची खरेदी करण्यात आली होती. पुण्यात लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे वाहनखरेदीदेखील वाढल्याचं दिसत आहे.
पुणे आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात 10,872 वाहनांची खरेदी केली आहे. त्यासंदर्भातील त्यांच्याकडे नोंदी आल्या होत्या. त्यात अनेकांनी विशेष क्रमांक घेण्यावर देखील भर दिला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन घरी घेऊन जाण्यासाठी 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केल्याची नोंद आहे. त्यामुळे वाहन खरेदीत मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. यात बाईक/ मोटारसायकल आणि कार या गाड्यांची जास्त प्रमाणात खरेदी झाली आहे. यात मोटार सायकल (Motor cycle) – 6,419, कार (Car) - 3,531 रिक्षा – 241, गुडस - 335, टॅक्सी - 309, बस - 37 या वाहनांचा समावेश आहे.
900 हून ई-वाहनांची खरेदी (E-vehicle)
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने अनेकांनी ई-वाहनाकडे कल दिसत आहे. शहरात आतापर्यंत अनेकांनी ई-वाहन खरेदी केले आहे. वेगवेगळ्या कंपनीचे आणि वेगवेगळे फिचर्स असलेले ई-वाहन सध्या उपलब्ध असल्याने अनेकांनी ई-वाहनांच्या खरेदीवर भर दिला आहे. ऐरवी ई-वाहन खरेदीवर ग्राहकांचा भर असतोच मात्र दसऱ्याच्या दिवशी किंवा ऑक्टोंबर महिन्यात 900 हून वाहनांची नोंद झाली झाली आहे
एकीकडे वाहतूक कोंडी दुसरीकडे खरेदी
पुण्यात खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक परिसरात वाहतूक कोंडीचं चित्र निर्माण झालं. अनेकांना स्वत:ची गाडी असणं, हे स्वप्न असतं मात्र शहराच्या दृष्टीने बघायला गेलं तर याच खासगी वाहनांमुळे पुण्यात वाहतूक कोंडी होते. घरात चार लोक असतात मात्र प्रत्येकासाठी वेगळी वाहनं खरेदी केली जातात. त्यामुळे शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. पुण्यात दरवर्षी लोकसंख्येतदेखील वाढ होत आहे. त्याचा परिणाम गाड्या खरेदीवरदेखील दिसत आहे. यंदा पुणेकरांनी भरपूर प्रमाणात गाड्या खरेदी केल्याचं दिसत आहे.
इतर महत्वाची बातमी-