Shiv Sena Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Live Updates : मुंबईला दुसऱ्या मार्गाने तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे... महापालिकेच्या ऐवजी आता नीती आयोग मुंबईचा विकास करणार; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Live : शिवाजी पार्क मैदानात ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडतोय. या दसरा मेळाव्यात ठाकरे गटाची पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट होणार आहे. या मेळाव्याचे लाईव्ह अपडेट्स....

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Oct 2023 08:53 PM
Dasara Melava : पीएम केअर फंडची चौकशी करण्याची मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलीये.

Dasara Melava :  जर तुम्ही मुंबईची चौकशी करताय तर पीएम केअर फंडाची आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांची चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीये. 

Dasara Melava : मोदी सरकार गेलंच पाहिजे. पाशवी बहुमत असेलेलं सरकार नको, असं उद्धव ठाकरे म्हणाले

Dasara Melava :  मोदी सरकार गेलंच पाहिजे. पाशवी बहुमत असेलेलं सरकार नको असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघात केला.  

Dasara Melava :  उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला

Dasara Melava :  मी घराणेशाहीचा पाईक आहे. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. कुटुंबव्यवस्था न मानणाऱ्यांनी घराणेशाहीविषयी आम्हाला सांगू नये, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनी टोला लगावला. 

Dasara Melava : उद्धव ठाकरेंकडून मनोज जरांगेंच कौतुक

Dasara Melava :  उद्धव ठाकरे यांनी भाषणावेळी मनोज जरांगे यांचे आभार मानले. त्यांनी शांततेत सुरु ठेवलेल्या आंदोलनाचं आणि धनगर समाजाला त्यांनी दिलेल्या पाठिंब्यांचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं. 

Dasara Melava : मुंबईला दुसऱ्या मार्गाने तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे... महापालिकेच्या ऐवजी आता नीती आयोग मुंबईचा विकास करणार; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :  मुंबईला दुसऱ्या मार्गाने तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेच्या ऐवजी आता नीती आयोग मुंबईचा विकास करणार...पालकमंत्री केलं एका बिल्डरला... त्याचं ऑफिस मुंबई महापालिकेत... मुंबई बिल्डरांना देण्यासाठीचा प्रयत्न 

Dasara Melava : आज दमदाट्या करणाऱ्यांना सांगतो, आमच्या लोकांना विनाकारण आज त्रास दिला तर आमचं सरकार आलं तर तुम्हालाही उलट टांगू; उद्धव यांचा इशारा

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :  आज दमदाट्या करणाऱ्यांना सांगतो, आमच्या लोकांना विनाकारण आज त्रास दिला तर आमचं सरकार आलं तर तुम्हालाही उलट टांगू; उद्धव यांचा भाजपला इशारा

Dasara Melava : ज्याप्रमाणे हनुमानाने सोन्याची लंका दहन केली....तशीच तुमची खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे आहे; उद्धव ठाकरे

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray : रावण हा शिवभक्त होता... तरीही श्रीरामाला त्याला मारावं लागले....वध करावे लागले....कारण तो माजला होता...ज्याप्रमाणे हनुमानाने सोन्याची लंका दहन केली....तशीच तुमची खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे आहे....

Dasara Melava : दादा भुसे याने 178 कोटी रुपयांची फसवणूक केली, गिरणा साखर कारखाना.. 200 रुपये हडप केले, त्याला उलटे लटकवण्याऐवजी मंत्री केले : संजय राऊत

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :   दादा भुसे याने 178 कोटी रुपयांची फसवणूक केली, गिरणा साखर कारखाना.. 200 रुपये हडप केले, त्याला उलटे लटकवण्याऐवजी मंत्री केले: संजय राऊत

Dasara Melava : प्रताप सरनाईक, भावना गवळी यांना ईडीच्या नोटीस दिल्यात... आता भाजपासोबत आहेत....कोणाला उलट लटकवणार; संजय राऊत यांचा भाजपला सवाल

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :   प्रताप सरनाईक, भावना गवळी यांना ईडीच्या नोटीस दिल्यात... आता भाजपासोबत आहेत....कोणाला उलट लटकवणार; संजय राऊत यांचा भाजपला सवाल 

Dasara Melava : कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नाही, सगळ्यांना भाजपात सामील करणार; संजय राऊतांचा भाजपवर वार

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :  कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नाही, सगळ्यांना भाजपात सामील करणार; संजय राऊतांचा भाजपवर वार 

Dasara Melava : इकडं शिवतीर्थावर मराठा तितुका मेळवावा...तिकडे सुरू आहे मराठा तितुका लोळवावा; संजय राऊत यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :   इकडं शिवतीर्थावर मराठा तितुका मेळवावा...तिकडे सुरू आहे मराठा तितुका लोळवावा; संजय राऊत यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

Dasara Melava : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :   शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन

Dasara Melava : कॅगचे कामकाज आता ठप्प करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत; भास्कर जाधवांचा आरोप

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :  कॅगचे कामकाज आता ठप्प करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत; भास्कर जाधवांचा आरोप 

Dasara Melava : मागच्या दोन निवडणुकीत शिवसेना तुमच्यासोबत होती...आता तुमच्यासोबत नाही...सत्तेत तुम्ही राहणार नाही; भास्कर जाधवांचा भाजपवर हल्लाबोल

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :  मागच्या दोन निवडणुकीत शिवसेना तुमच्यासोबत होती...आता तुमच्यासोबत नाही...सत्तेत तुम्ही राहणार नाही; भास्कर जाधवांचा भाजपवर हल्लाबोल 

Dasara Meleva : ज्यावेळी जवान पुलवामामध्ये जवान शहीद झाले. त्यावेळी पंतप्रधान चित्रीकरणात व्यस्त होते : भास्कर जाधव

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :  ज्यावेळी जवान पुलवामामध्ये जवान शहीद झाले. त्यावेळी पंतप्रधान चित्रीकरणात व्यस्त होते : भास्कर जाधव 

Dasara Meleva : ज्यावेळी जवान पुलवामामध्ये जवान शहीद झाले. त्यावेळी पंतप्रधान चित्रीकरणात व्यस्त होते : भास्कर जाधव

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :  ज्यावेळी जवान पुलवामामध्ये जवान शहीद झाले. त्यावेळी पंतप्रधान चित्रीकरणात व्यस्त होते : भास्कर जाधव 

Dasara Melava : कोर्टाचा निकालविरोधात गेल्यानंतरही तुम्ही सरकार टिकवू शकता, तर मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण देण्यास उशीर का? नितीन बानगुडे पाटील यांचा सवाल

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :   कोर्टाचा निकालविरोधात गेल्यानंतरही तुम्ही सरकार टिकवू शकता, तर मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण देण्यास उशीर का? नितीन बानगुडे पाटील यांचा सवाल

Dasara Melava : शिस्तीत राहायचे, धमक्या देण्याचे काम नाही, चळवळीतून आलेली आहे, धमक्यांना घाबरत नाही; सुषमा अंधारे यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :  शिस्तीत राहायचे, धमक्या देण्याचे काम नाही, चळवळीतून आलेली आहे, धमक्यांना घाबरत नाही; सुषमा अंधारे यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा

उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल...बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर केले अभिवादन....

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल...बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर केले अभिवादन....

देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हणतात.. पण मला ती अतिशययोक्ती वाटते...चाणक्य माणसं घडवतात... तुम्ही कोणाला घडवताय...तुम्ही माणसं संपवत आहेत; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल 

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हणतात.. पण मला ती अतिशययोक्ती वाटते...चाणक्य माणसं घडवतात... तुम्ही कोणाला घडवताय...तुम्ही माणसं संपवत आहेत; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल 

मला नोटीस दिली असल्याची सांगणारे पडद्याआडून मांडवलीसाठी प्रयत्न करत आहेत; सुषमा अंधारे यांचा खळबळजनक दावा

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray : मला नोटीस दिली असल्याची सांगणारे पडद्याआडून मांडवलीसाठी प्रयत्न करत आहेत; सुषमा अंधारे यांचा खळबळजनक दावा 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ताफा सीलिंकहून वरळीला पोहोचला

Uddhav Thackeray :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ताफा सीलिंकहून वरळीला पोहोचला आहे. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे व्यासपीठावर दाखल होमार आहेत. 

शासन आपल्या दारी पण खरंतर या सरकारकडून मृत्यू घरोघरी; रुग्णालयातील मृत्यू तांडवावरून दानवेंची सरकारवर टीका

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :  शासन आपल्या दारी पण खरंतर या सरकारकडून मृत्यू घरोघरी; रुग्णालयातील मृत्यू तांडवावरून दानवेंची सरकारवर टीका 

उद्धव ठाकरेंना शेतीतले काही कळत नाही म्हणता, पण याच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली : अंबादास दानवे

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :    उद्धव ठाकरेंना शेतीतले काही कळत नाही म्हणता, पण याच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली : अंबादास दानवे 

उद्धव ठाकरेंना शेतीतले काही कळत नाही म्हणता, पण याच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली : अंबादास दानवे

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :    उद्धव ठाकरेंना शेतीतले काही कळत नाही म्हणता, पण याच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली : अंबादास दानवे 

उद्धव ठाकरेंना शेतीतले काही कळत नाही म्हणता, पण याच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली : अंबादास दानवे

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :    उद्धव ठाकरेंना शेतीतले काही कळत नाही म्हणता, पण याच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली : अंबादास दानवे 

उद्धव ठाकरेंना शेतीतले काही कळत नाही म्हणता, पण याच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली : अंबादास दानवे

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :    उद्धव ठाकरेंना शेतीतले काही कळत नाही म्हणता, पण याच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली : अंबादास दानवे 

उद्धव ठाकरेंना शेतीतले काही कळत नाही म्हणता, पण याच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली : अंबादास दानवे

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :    उद्धव ठाकरेंना शेतीतले काही कळत नाही म्हणता, पण याच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली : अंबादास दानवे 

उद्धव ठाकरेंना शेतीतले काही कळत नाही म्हणता, पण याच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली : अंबादास दानवे

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :    उद्धव ठाकरेंना शेतीतले काही कळत नाही म्हणता, पण याच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली : अंबादास दानवे 

शेतकरी संकटात आहे तर दुसरीकडे सरकारला पिक विमा कंपन्यांची चिंता; अंबादास दानवे यांचा आरोप

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :    शेतकरी संकटात आहे तर दुसरीकडे सरकारला पिक विमा कंपन्यांची चिंता; अंबादास दानवे यांचा आरोप 

महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती आहे. शेतकऱ्यांना एक रुपयांच्या पिक विम्याचे गाजर आहे... विमा कंपन्यांचे खिशे भरण्यासाठी योजना आहे का? अंबादास दानवे यांचा सवाल

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :    महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती आहे. शेतकऱ्यांना एक रुपयांच्या पिक विम्याचे गाजर आहे... विमा कंपन्यांचे खिशे भरण्यासाठी योजना आहे का? अंबादास दानवे यांचा सवाल 

तुम्हाला घरीच बसायचे आहे...निवडणुकीआधीच तुम्हाला घरी बसावे लागेल; अंबादास दानवे यांची टीका

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :   तुम्हाला घरीच बसायचे आहे...निवडणुकीआधीच तुम्हाला घरी बसावे लागेल; अंबादास दानवे यांची टीका 

तुम्हाला घरीच बसायचे आहे...निवडणुकीआधीच तुम्हाला घरी बसावे लागेल; अंबादास दानवे यांची टीका

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :   तुम्हाला घरीच बसायचे आहे...निवडणुकीआधीच तुम्हाला घरी बसावे लागेल; अंबादास दानवे यांची टीका 

बाळासाहेबांची खुर्ची तुमच्याकडे असेल पण त्यांचा आत्मा आमच्या शिवसैनिकांकडे आहे; किशोरी पेडणेकरांची शिंदे गटावर हल्लाबोल

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :    बाळासाहेबांची खुर्ची तुमच्याकडे असेल पण त्यांचा आत्मा आमच्या शिवसैनिकांकडे आहे; किशोरी पेडणेकरांची शिंदे गटावर हल्लाबोल

Dasara Melava : उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा लाईव्ह

Dasara Melava :  उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा लाईव्ह


Dasara Melava : क्षमा कोणालाच करायची नाही...निवडणूक लागू द्या मग त्यांना दाखवून देऊ; किशोरी पेडणेकर यांचा इशारा

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :  क्षमा कोणालाच करायची नाही...निवडणूक लागू द्या मग त्यांना दाखवून देऊ; किशोरी पेडणेकर यांचा इशारा 

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात; किशोरी पेडणेकर यांचे पहिले भाषण

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :  ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात; किशोरी पेडणेकर यांचे पहिले भाषण

Dasara Melava : शिवसेनेचा दसरा मेळावा एकच, बाकी G-20 नंतर इव्हेंट सुरू आहे; आमदार सचिन अहिर यांची शिंदे गटावर टीका

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :  शिवसेनेचा दसरा मेळावा एकच असतो. बाकी G-20 नंतर इव्हेंट सुरू असल्याची टीका आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटावर केली. शिंदे गट कशी गर्दी करतो हे मागील वर्षीच दिसून आले होते, असेही अहिर यांनी म्हटले. 

खासदार संजय राऊत शिवाजी पार्कवर दाखल

Sanjay Raut : शिवसेना नेते खासदार संजय राऊत शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दसरा मेळावा सुरु होणार आहे. 

शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी जमण्यास सुरुवात

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा शिवतीर्थावर होत आहे. यासाठी राज्यभरातून शिवसैनिक दाखल होत आहेत. 

पेटती मशाली घेऊन साताऱ्याचे शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray : शिवतीर्थावर होत असलेल्या दसरा मेळाव्याला राज्यभारातील शिवसैनिकांचा ताफा दाखल होत आहे. पेटती मशाली घेऊन साताऱ्याचे शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले. याच मशालीत गद्दारांना जाळू, असा निर्धार शिवसैनिकांनी बोलून दाखवला. 

उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी शेकडो शिवसैनिक कल्याणमधून दादरच्या दिशेने रवाना

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :   कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी दादरमधील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी शेकडो शिवसैनिक कल्याणमधून दादरच्या दिशेने लोकलने रवाना झाले आहेत. 

शिवसैनिकांची प्रकृती बिघडल्यास तातडीने उपचार मिळणार; शिव आरोग्य सेनेचे डॉक्टर शिवतीर्थावर सज्ज

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray : एकीकडे शिवसेनेचे दोन मेळावे यामुळे राजकीय वातावरण तापलेले असताना , मुंबईत उष्णतेच्या झळा ही वाढल्यात.यामुळे हजारो च्या संख्येने येणाऱ्या शिवसैनिकांना त्रास झाल्यास शिवतीर्थावर डॉक्टरांची यंत्रणा सज्ज आहे.शिव आरोग्य सेनेची शंभर डॉक्टर इथे मदतीला तैनात असतील, आवश्यक प्रथोमपचार केले जातील.कोव्हिड काळात उद्भव ठाकरे यांनी जनतेसाठी केलेल्या कामाची उतराई होण्याची ही संधी असल्याचे शिव आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद पवार यांनी म्हटले. 

शिवाजी पार्कवरुन ठाकरेंची मशाल धग देणार ? कुणावर निशाणा साधणार?

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray : शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; 'या' मुद्यांवर भाष्य करणार? वाचा सविस्तर बातमी....

Sushma Andhare: गेल्यावेळी स्टेजवर एक खुर्ची रिकामी, यंदा काय?, मेळाव्याला निघण्यापूर्वी सुषमा अंधारेंनी झलक दाखवली...

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray : गेल्यावेळी स्टेजवर एक खुर्ची रिकामी, यंदा काय?, मेळाव्याला निघण्यापूर्वी सुषमा अंधारेंनी झलक दाखवली... वाचा बातमी एका क्लिकवर...

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा हा इतिहास माहित आहे का? वाचा एक क्लिकवर...

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :  शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा हा इतिहास माहित आहे का? वाचा एक क्लिकवर...

पार्श्वभूमी

Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Live : उद्धव यांच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेदेखील निशाण्यावर असणार आहेत. तर, अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


दसऱ्यानिमित्ताने आज होणाऱ्या सभांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके वाजणार आहेत. आज सगळ्या राज्याचे लक्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे (Shiv Sena Dasara Melava)  लागले आहे. शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde) दसरा मेळावे होणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यावर शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीची पार्श्वभूमी अधिक ठळकपणे होती. त्याशिवाय, ठाकरे गटाला मैदान मिळवण्यासाठी हायकोर्टापर्यंत धाव घ्यावी लागली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या दसरा मेळाव्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Dasara Melava Speech) यांनी बंडखोरांवर आणि भाजपवर टीकेचे बाण सोडले होते. यंदाच्या भाषणात उद्धव यांच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेदेखील निशाण्यावर असणार आहेत. तर, अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


 


>> उद्धव यांच्या भाषणात  या मुद्यांचा समावेश असणार?


> काही महिन्यातच होणाऱ्या  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी आणि भाजपचे सरकार असणार आहे. उद्धव यांनी शिवसैनिकांना होऊ दे चर्चा हा कार्यक्रम दिला होता. यातून केंद्र सरकारच्या कारभाराचे आणि निवडणूक आश्वासनांचे वाभाडे काढण्यात आले. आता, उद्धव पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर कोणता हल्लाबोल करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. त्याशिवाय, उद्धव ठाकरे हे विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीबद्दलही उपस्थित शिवसैनिकांना आपली भूमिका अधिक स्पष्ट करून सांगण्याची शक्यता आहे. 


> जानेवारी 2024 मध्ये अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी भाजप पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून सातत्याने ठाकरे गटावर हिंदुत्वाच्या मुद्यावर टीका केली जात आहे. राम मंदिर उद्घाटन आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव हे आपल्या भाषणात भाजपवर, शिंदे गटावर प्रहार करण्याची शक्यता आहे.


> राज्यात कमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी दुष्काळाची स्थिती आहे. अशा स्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. पिक विम्याची रक्कम मिळत नसल्याचे आरोप होत आहे. पिक विमा योजनेतील घोटाळा, राज्य सरकारचे असलेले दुर्लक्ष आदी मुद्यांवर उद्धव भाष्य करतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


>  राज्यात गाजत असलेला मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उद्धव भाष्य करू शकतात. उद्धव यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवता आले नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतो. त्यालाही उत्तर देत मराठा समाजाला वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून करू शकतात. 


> शासकीय कार्यकारी पदांसाठी कंत्राटी नोकर भरतीचा आदेश सरकार काढला. विद्यार्थी-युवकांच्या विरोधानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जीआर मागे घेणार असल्याची घोषणा केली. त्यावेळी फडणवीस यांनी याचे खापर मविआ सरकारवर फोडले. त्यालाही उद्धव उत्तर देण्याची शक्यता आहे.  


> त्याशिवाय परदेश दौरे, भ्रष्टाचार, ड्रग्ज रॅकेट, राज्यातील कायदा-सुव्यवस्था या विषयांवर शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारवर उद्धव तोफ डागण्याची शक्यता आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.