Pune :   सर्वाचेच लाडके दैवत दगडूशेठ गणपती बाप्पाचा (Dagdusheth Halwai Ganpati) सूर्यकिरणांनी महाभिषेक करण्यात आला आहे. धार्मिक कार्यक्रमांनी गणेशभक्तांतर्फे करण्यात येणा-या अभिषेक आणि पूजा-अर्चनेप्रमाणेच आज (11 फेब्रुवारी)  दगडूशेठ गणपती बाप्पांना सूर्यनारायणाने सूर्यकिरणांनी महाभिषेक केला. गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडली आणि जय गणेश...जय गणेशचा जयघोष झाला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभा-यात प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडतात.


श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शुक्रवारी (11 फेब्रुवारी) सकाळी उपस्थित भाविकांनी हा सोहळा अनुभविला. सकाळी 8 वाजून 25 मिनीटे ते 8 वाजून 31 मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला. श्रीं च्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती. त्यासोबतच देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या चांदीच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणांनी स्पर्श केला.


 ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, गेले तीन दिवस दररोज सकाळी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडत आहेत. दगडूशेठ गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने ही किरणे मूर्तीवर पडतात. मंदिराची रचना पूर्वाभिमुख व उंच असल्याने गाभा-यात सूर्यकिरणांचा यावेळी प्रवेश होतो. माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये हा सोहळा दरवर्षी अनुभवायला मिळतो. त्यामुळे भाविकांना हा सोहळा गणेश जयंतीनंतर एका आठवडयामध्येच अनुभवता आला.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


bullock cart race : आंबेगावच्या लांडेवाडी घाटात बैलगाडा शर्यतीला सुरुवात, बैलगाडा  प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण


TET Exam Scam: अपात्र शिक्षकांची पत्त्यांसह यादी तयार, लवकरच कारवाईचा बडगा


ABP Impact : चंद्रभागेतील दूषित पाण्यापासून वारकऱ्यांची सुटका, नवीन पाणी सोडलं; पवित्र स्नानाचा आनंद 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha