एक्स्प्लोर

डब्यातून परकीय चलनाची तस्करी, पुणे विमानतळावर दोघांना बेड्या

निशांत विजय येतम नावाच्या आरोपीवर इमिग्रेशन अधिकाऱ्याला संशय आला. त्याची बॅगेची तपासणी केल्यानंतर तो नेत असलेल्या खाद्यपदार्थाच्या डब्यात काही रक्कम सापडली.

पुणे : एखाद्या खाद्यपदार्थाच्या डब्यातून सव्वा कोटी रुपये लपवून नेले जाऊ शकतात का, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 'नाही' असंच द्याल. मात्र पुणे विमानतळावर डब्यात परकीय चलन लपवून नेणाऱ्या दोन महाभागांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एक कोटी 30 लाख रुपये किमतीचं परकीय चलन ताब्यात घेतलं आहे. पुणे कस्टम विभागानं परदेशी चलनांची ही तस्करी पकडली. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश असून दोन्ही आरोपी एअर इंडियाच्या विमानाने पुणे विमानतळावरुन दुबईसाठी उड्डाण करणार होते. दोघांकडून 1 लाख 12 हजार 800 डॉलर जप्त करण्यात आले असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. निशांत विजय येतम नावाच्या आरोपीवर इमिग्रेशन अधिकाऱ्याला संशय आला. त्याची बॅगेची तपासणी केल्यानंतर तो नेत असलेल्या खाद्यपदार्थाच्या डब्यात काही रक्कम सापडली. त्यानंतर काही वेळेतच एच रंगलानी नावाच्या महिलेची बॅग तपासण्यात आली. त्यांच्याही बॅगेत काही परकीय चलन आढळलं. निशांत रायगडमधील नागोठण्याचा रहिवासी असून एच रंगलानी ही महिला मुंबईतील चेंबूरमध्ये राहते.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Embed widget