एक्स्प्लोर

Hunting turtles Daund : कासवाची शिकार महागात पडली; आरोपींना 25 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

दौंड तालुक्यातील वरवंड गावात कासव शिकार प्रकरणी आरोपींना 25 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.दौंड वनपरिक्षेत्रातील मौजे वरवंड येथील कानिफनाथ नगर भागात कासव शिकार प्रकरणातील आरोपींना न्यायलयाने वन कोठडी सुनावली आहे.

Hunting turtles Daund :  दौंड (daund) तालुक्यातील वरवंड गावात कासव (turtles)  शिकार प्रकरणी आरोपींना 25 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. वनविभाग पुणे अंतर्गत दौंड वनपरिक्षेत्रातील मौजे वरवंड येथील कानिफनाथ नगर भागात कासव शिकार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने वन कोठडी (फॉरेस्ट कस्टडी) सुनावली आहे. दादा सावंत आणि नाना सावंत या दोघांना कासव भाजून खायचं होतं. त्यामुळे दोघांनी मिळून कासवाची शिकार करण्याचा कट रचला. त्यानुसार दोघांनी मिळून कासवाला घरी आणले. या सगळ्याची माहिती एका व्यक्तीने वन विभागाला दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

या प्रकाराची माहिती कळताच वनविभागाचे कर्मचारी या दोघांच्या घरी पोहोचले. त्यांच्या घराची झडती घेतली असता कासवाचे तुकडे सापडले आणि घराबाहेर कासवाचे कवच देखील सापडले. त्यानुसार पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता दोघांनी कासव भाजून खाण्यासाठी कासवाची शिकार केल्याची कबुली दिली. त्यावरुन वन खात्याने नाना सावंत आणि दादा सावंत यांच्या विरोधात वन्यजीव अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला असून आरोपींना अटक केली होती. कासव हा वन्यप्राणी भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 च्या परिशिष्ठ 1 च्या भाग-2 मधील वन्यप्राणी असल्याने दादा नाना सावंत, नाना धर्मा सावंत, भिमराव रामभाऊ सावंत आणि शंकर दत्तू सावंत यांच्यावर भारतीय वन्यजीव वनगुन्हा नोंदवून त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दौंड यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

व्हाॅट्सअॅपवर पाठवला होता व्हिडीओ
खाण्यासाठी कासवाची शिकार केली जात आहे असं कळताच एक व्यक्तीने वनपाल यांना या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ करुन व्हाॅट्सअॅपवर पाठवला होता. हा व्हिडीओ पाहून वन अधिकारी आणि वनपाल यांनी ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या व्यक्तीकडून संपूर्ण माहिती गोळा केली. त्यानुसार कारवाई केली होती. 

न्यायालयाने त्यांना 25 ऑक्टोबरपर्यंत वन कोठडी सुनावली आहे. आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी आदेश दिले असून या प्रकरणी सहायक वनसंरक्षक दीपक पवार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे हे अधिक तपास करत आहेत.

शिकाऱ्याला 3 ते 5 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद
भारतीय वन्यजीव अधिनियमातील तरतुदींनुसार वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद असून कोणीही वन्यप्राण्याची शिकार करु नये अथवा त्यांच्या जिवाशी खेळू नये. नागरिकांना कुठेही वन्यप्राण्याची शिकार करताना एखादी व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ वनविभागाच्या हेल्पलाईन क्र.1926 वर संपर्क साधण्याचे आवाहन उपवनसंरक्षकांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget