Pune Crime News : पुण्यातील (Pune Crime) लोणी काळभोर परिसरात अंधश्रद्धेच्या नावाखाली एका 26 वर्षी उच्चशिक्षित सुनेचा अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काळे कपडे घालण्यास नकार आणि माताजीने दिलेल्या कुंकू लावण्यावरुन महिलेवर जबरदस्ती करण्यात येत होती. यानंतर या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन सासरच्या लोकांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुत्रप्राप्तीसाठी अट्टाहास
सासरच्या लोकांकडून पुत्रप्राप्तीसाठी अमानुष वागणूक देण्यात येत होती. महिलेला मानसिक त्रासही दिल्या जात होता. अंधश्रद्धेच्या नावाखाली हा सगळा प्रकार महिलेसोबत सासरचे लोक करत होते. काळे कपडे घातल्यास तुला मूल होणार नाही, त्यासोबतच माताजीचं कुंकू लावलं नाही तर मारहाण करणे यासारखे प्रकार वारंवार घडले. यानंतर या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन सासरच्या लोकांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. पती प्रतीक शरद गिरमे, सासरे शरद कृष्णाजी गिरमे, सासू सुरेखा शरद गिरमे आणि इतरांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेचे सासर हडपसर परिसरात असल्याने सध्या हा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
लग्नानंतर दाखवत होता अश्लिल व्हिडीओ
फिर्यादी महिला आणि तिचा पती उच्चशिक्षित आहेत. तर सासू-सासरे आणि दीर एका धार्मिक संस्थेची संबंधित आहेत. मात्र सुनीला अंधश्रद्धेच्या नावाखाली सासरची लोक सतत त्रास देत होते. माताजीनी दिलेले कुंकू लावण्यास भाग पाडणे, कुंकू पुसल्यास शिवीगाळ करुन मानसिक त्रास देणे असे प्रकार वारंवार सुरु होते. याशिवाय लग्नानंतर पतीने वारंवार पॉर्न व्हिडीओ दाखवून फिर्यादीवर अनैसर्गिक अत्याचार केले होते.
अंधश्रद्धेच्या नावाखाली छळाचं सत्र सुरुच
काही दिवसांपुर्वी पुण्यातील मांत्रिकाने कुटुंबीयांसमोर महिलेला नग्न होऊन आंघोळ करायला लावण्याचा घृणास्पद प्रकार घडला होता. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. पुत्र प्राप्ती व्हावी, कुटुंब नीट राहावं, घरातील भानामती नष्ट व्हावी आणि आयुष्याची भरभराट व्हावी यासाठी तांत्रिकाने महिलेला नग्न होऊन आंघोळ करायला लावली होती. या मांत्रिकाने पती आणि सासू-सासऱ्यासमोर हा घृणास्पद प्रकार करायला लावल्याने सगळीकडे संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणातील पती शिवराज गोरडकर, सासरे राजेंद्र कोरटकर, सासू चित्ररेखा कोरटकर यांच्यासह मांत्रिक मौलाना बाबा जमादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेकडून वेळोवेळी एक ते दोन कोटी रुपये उकळले असून तिला मारहाण देखील करण्यात येत होती.
इतर महत्वाच्या बातम्या