Pune Crime News: पुण्यात मांत्रिकाने कुटुंबीयांसमोर महिलेला नग्न होऊन अंघोळ करायला लावण्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. पुत्र प्राप्ती व्हावी, कुटुंब नीट रहाव, घरातील भानामती नष्ट व्हावी आणि आयुष्याची भरभराट व्हावी यासाठी तांत्रिकाने महिलेला नग्न होऊन आंघोळ करायला लावली आहे. या मांत्रिकाने पती आणि सासू-सासऱ्यासमोर हा  घृणास्पद प्रकार करायला लावल्याने सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील पती शिवराज गोरडकर, सासरे राजेंद्र कोरटकर, सासू चित्ररेखा कोरटकर यांच्यासह मांत्रिक मौलाना बाबा जमादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या महिलेकडून वेळोवेळी 1 ते 2 कोटी रुपये उकळले असून तिला मारहाण देखील करण्यात आली. याप्रकरणी आता भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहित महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. सासरच्यांकडून वेळोवेळी फिर्यादीचे शारीरिक आणि मानसिक शोषण करण्यात येत होते. फिर्यादीला तिच्या आई-वडिलांकडून लग्नात मिळालेले तिचे दागिने आणि फ्लॅटची कागदपत्रे परस्पर बँकेत ठेऊन त्यावर बनावट स्वाक्षरी करून 75 लाखांचे कर्ज घेतले. तसेच फिर्यादीच्या पतीने व्यवसायात भरभराटी आणि घरात शांतता नांदावी म्हणून फिर्यादीसोबत अघोरी पुजा केली. त्यावेळी तिला सर्वांसमोर नग्न होऊन अंघोळ करायला लावली. याबद्दलचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत. चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून मांत्रिकला अजून अटक करण्यात आली नाही.


दोघांचा 2013 मध्ये झाला होता विवाह


पीडित महिलेचा 2013 मध्ये आरोपी असलेला पती शिवराज गोरडकर याच्या बरोबर विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून घरातील मंडळीने पीडित महिलेला त्रास देत होते. अनेक वर्ष महिलेने हा त्रास सहन केला मात्र काही दिवसांनी तिच्यावर अनिष्ठ प्रथा करण्यास सुरुवात केली.फिर्यादीच्या पतीने व्यवसायात भरभराटी आणि घरात शांतता नांदावी म्हणून फिर्यादीसोबत अघोरी पुजा केली. पुत्र प्राप्ती होत नसल्याने हा अंधश्रद्धेचा मार्ग अवलंबवून वेगवेगळ्या पुजा केल्या होत्या. दरम्यान आजही महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.