Pune Crime : पुण्यातील (Pune Crime ) नामांकित शाळेतील (Pune School) अल्पवयीन मुलांवर डान्स टिचरकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान, या प्रकरणी आता पोलिसांनी शाळेच्या संस्थाचालकाला अटक केली आहे. दोनअल्पवयीन मुलांचा डान्स टिचरने लैंगिक  छळ केल्याप्रकरणी नामांकित शाळेच्या संस्थाचालकाला अटक करण्यात आली आहे. अन्वित पाठक अस संस्थाचालकाच नाव आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याने वारजे  पोलिसांनी (Pune Police) संस्थाचालकाला ठोकल्या बेड्या ठोकल्या आहेत. 


काय आहे संपूर्ण प्रकरण ? 


पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका शाळेत आरोपी मंगेश साळवे हा डान्स टीचर म्हणून कार्यरत होता. नृत्य शिकवत असताना साळवे हा शालेय विद्यार्थ्यांच्या शरीराला जाणून बुजून हाथ लावत असे. एका 11 वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्याबाबत घडलेला प्रकार समुपदेशन सुरू असताना सांगितला आणि त्यानंतर त्याच्या आई वडिलांना देखील याबाबतची माहिती दिली आणि तात्काळ त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सुद्धा प्रकरण गांभीर्याने घेत शिक्षक मंगेश साळवे याला अटक केली. यापूर्वी सुद्धा त्याने इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक छळ केल्याचे समोर आल होतं. आरोपीवर अशा प्रकारचा गुन्हा केल्याप्रकरणी आणखी एका गुन्हा दाखल करण्यात आला होता.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  चौथी आणि  सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोबत हा प्रकार घडला आहे. शाळेतील एक शिक्षक हा 2022 पासून कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर कार्यरत आहे. काल तक्रार येताच आम्ही तात्काळ या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला अटक केली आहे. आम्ही त्याची वैद्यकीय तपासणी करत आहोत तसेच शाळेतील ज्या विद्यार्थ्यांच्या बाबत हा प्रकार घडला आहे त्यांचे देखील स्टेटमेंट घेतली आहेत, अशी माहिती पोलीस उपयुक्त संभाजी कदम यांनी दिली. हा सगळा प्रकार शाळेत सुरू असलेल्या समुपदेशनमुळे समोर आला. शाळेच्या मधल्या वेळेत आरोपीने हे कृत्य केलं आहे.  याप्रकरणात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. वारजे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली...






इतर महत्त्वाच्या बातम्या


Santosh Deshmukh Case: विष्णू चाटे अँड गँग ऑफ सफेपुर,त्यांचा आका कोण? सुरेश धस यांचा रोख कोणाकडं; म्हणाले, 'मी अद्याप कोणाचे नाव...'


Parbhani Violence Case : परभणी हिंसाचार प्रकरणात महत्त्वाची अपडेट, 3 पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश