पुणे :  पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  जेवण वाढताना  (Pune Crime News) वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया रमेश ससाणे (वय 34, रा. पत्र्याची चाळ, जयभीम मित्रमंडळाजवळ, भवानी पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत रमेश बबन ससाणे (वय 43 ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 


रमेश ससाणे कामावरून घरी जेवण करण्यासाठी आले. त्या वेळी पत्नी जयाने त्यांच्याकडे 500रुपये मागितले. पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर तिने जेवण वाढताना ताट आणि तांब्या आपटला. त्यामुळे रमेश यांनी पत्नीला चापट मारली. या कारणावरून वाद झाला. जयाने पती रमेश यांचा दंड आणि पाठीवर चाकूने वार केले. 


राग अनावर झाला अन् पत्नीनं थेट


पुण्यात सध्या कौटुंबिक हिंसाचारात चांगलीच वाढ झाली आहे.  अनेक महिला  हा हिंसाचार सहन करताना दिसत असतात. मात्र एक स्तर गाठला की महिलादेखील आक्रमक होताना दिसत आहे. त्यातूनच अशा घटना पुढे येत आहे. या घटनेतदेखील ते पुन्हा एकदा समोर आलं आहे. पतीने चापट मारल्यानंतरच महिला संतापली आणि तिने थेट चाकूने वार केले. 


पती पत्नीच्या वाद अन्...



काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील वानवडी पोलीस  स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना उघडकीस आली होती. पत्नीने केलेल्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीचा मृत्यू झाला होता. घरगुती भांडणातून वाद झाल्यानंतर पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला होता. निखिल पुष्पराज खन्ना (वय 36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव होतं. रेणुका निखिल खन्ना (वय 38) यांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. निखिल आणि रेणुका यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. दरम्यान दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात पत्नी रेणुका हिने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. त्यानंतर तिने फोन करून सासरे असलेल्या डॉक्टर खन्ना यांना याची माहिती दिली. डॉक्टर खन्ना घरी आले आणि त्यांनी निखिल यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही आणि निखिल यांचा मृत्यू झाला होता. मयत निखिल हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक होते. 


इतप महत्वाची बातमी-


Pune Crime News : मोठी बातमी : अल्पवयीन मित्राला संपवून व्हिडीओ स्टेटस ठेवला, क्रूर कृत्याने पुणे पुन्हा हादरलं!