पुणे : राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण  खर्चासाठी (Maharashtra Budget 2024 ) 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत सादर केला. राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला आहे. यात पुणे जिल्ह्यासाठी  विविध महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यात शिवनेरी संग्रहालय, रिंग रोड, विविध स्मारक,  स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूरसाठी निधी देण्यात आला आहेय त्यासोबत अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 


यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात पुणे जिल्हयाला काय मिळालं?


-राजगुरु नगरच्या हुतात्मा श्री शिवराव हरी राजगुरु जन्मस्थळ विकासासाठी पहिल्या टप्प्यात 102 कोटी विकास निधी देण्यात आला आहे.


-मौजे वडज, तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय 


-पुणे चक्राकार वळण मार्गाकरीता भूसंपादनासाठी 10 हजार 519 कोटी


-पुणे-लोणावळा रेल्वे मार्गांकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग


-संगमवाडी,पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक 


-स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, ता. हवेली व समाधी स्थळ वढू बुद्रुक तालुका शिरुर, जिल्हा पुणे येथील स्मारक- 270 कोटी रुपये किमतीचा आराखडा, काम सुरु


-लोणावळा, जिल्हा पुणे येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प- 333 कोटी 56 लाख किंमत


-50 नवीन पर्यटन स्थळांच्या ठिकाणी थीम पार्क, ॲडव्हेंचर स्पोर्टस्, शॉपिंग मॉल, वॉटर पार्क आणि निवास व्यवस्था 


-नागपूर एम्सच्या धर्तीवर औंध, पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था 


-कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु


-एकविरादेवी मंदिर जिल्हा पुणे तिर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना



राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी  आवश्यक धोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक, नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता विकास योजनांवर भर देण्यात आली आहे. राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत आज सादर करण्यात आला.


इतर महत्वाची बातमी-


Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशातून मराठवाड्याच्या वाट्याला काय मिळाले?, पाहा संपूर्ण यादी...


 Maharashtra Budget 2024: अजित पवारांचा अर्थसंकल्प A To Z; राज्याचा अर्थसंकल्प वाचा जसाच्या तसा