पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात गुरुवारी (Pune News) काही परिसरात पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे. भामा आसखेड प्रकल्पाशी संबंधित सुरू असलेल्या बांधकामांमुळे गुरुवार 29 फेब्रुवारी 2024 रोजी अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नव्याने बांधण्यात आलेली पाईपलाईन मुख्य पाणी पुरवठ्याच्या जाळ्याला जोडणे आणि ठाकरशी टाकीवरील देखभालदुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार 1 मार्च 2024 रोजी सकाळच्या वेळेत पाण्याचा दाब कमी होण्याची शक्यता आहे.
भामा आसखेड प्रकल्पांतर्गत ठाकरशी तलावातील पाईपलाईनवर फ्लो मीटर बसविल्याने 29 फेब्रुवारी 2024 रोजी पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्याचप्रमाणे1 मार्च 2024 रोजी पाण्याचा दाब कमी होण्याची शक्यता देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे आहे. सर्व नागरिकांनी याची दखल घेऊन त्यानुसार सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्या परिसरात पाणीपुरवठा बंद असेल?
आदर्श नगर, कल्याणी नगर, हरिनगर, रामवाडी, शास्त्रीनगर, संपूर्ण गणेश नगर, म्हस्के वस्ती परिसर, कळस, माळवाडी, जाधव वस्ती, विशाल संकुल, विश्रांतवाडी सेक्टर 112अ, कस्तुरबा, टिंगरे नगर पंप ते विश्रांतवाडी चौक, जय जवान नगर, जय प्रकाशनगर, संजय पार्क,विमानतळ क्षेत्र, यमुना नगर, दिनकर पठारे वस्ती, पराशर सोसायटी,मिस्टर पार्क,ठुबे पठारे नगर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुण्यात पाणीकपात नाही!
भर उन्हाळ्यात पुणेकरांची पाणीकपात टळली आहे. कालवा समितीच्या बैठकीत पुण्यात पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कालवा समितीची बैठक घेतली. या बैठकीत धरण साखळीतील पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला.मागील काही महिन्यांपासून पुणेकरांवरची पाणी कपातीची टांगती तलवार होती. पाणीकपात होणार आणि भर उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार असल्याचं चित्र होतं. पंचवीस वर्षातील सर्वात कमी पाऊस यावेळी पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रात झाला होता मात्र तरीही यावेळी पुणेकरांना पाणी कपातील सामोरे जावे लागणार नाही.
- Pune Crime News : मोठी बातमी : अल्पवयीन मित्राला संपवून व्हिडीओ स्टेटस ठेवला, क्रूर कृत्याने पुणे पुन्हा हादरलं!
- स्त्री भ्रूण हत्या थांबवा अन् लाखभर रुपयांचं बक्षिस मिळवा; नवी हेल्पलाईन जारी