Pune Crime News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील (Pune Crime) राजकीय नेत्यांना धमकीचे फोन करुन खंडणीची मागणी केली जात आहे. यामध्ये भाजपचे (BJP) आमदार महेश लांडगे (Mahesh Landge), काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे (Avinash Bagwe) आणि मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांचा समावेश आहे. या धमकीच्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या तिनही राजकीय नेत्यांना एकाच व्यक्तीने फोन करुन धमकी दिल्याचं समोर आलं आहे. एकतर्फी प्रेमातून मुलीला धडा शिकवण्यासाठी या तरुणाने मुलीच्या नावे नेत्यांना धमकी दिल्याचं समोर आलं आहे. वसंत मोरेंना धमकी दिल्याप्रकरणी या तरुणाला अटक करण्यात आली होती पण त्याची जामिनावर सुटका झाली. मात्र सुटकेनंतरही त्याने आपले प्रताप सुरुच ठेवले आणि अविनाश बागवे आणि महेश लांडगे यांनी धमकी दिली. त्याप्रकरणी पुन्हा या तरुणाला अटक करण्यात आली आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?


इम्रान शेख असं आरोपीचे नाव आहेत. या तिघांनाही धमक्या देणारा व्यक्ती एकच आहे. धमकी देणारा तरुण पुण्यातील घोरपडी भागात राहत असून विवाह नोंदणी अर्थात मेट्रोमोनीयल बेवसाईट चालवतो. या मुलाकडे एका मुलीचे प्रोफाईल आले. ती मुलगी या व्यक्तीला आवडली आणि त्याने स्वतःच या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र मुलीने नकार दिला. त्यामुळे चिडून या व्यक्तीने त्या मुलीच्या नावाने राजकीय नेत्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. एकतर्फी प्रेमातून घडलेला हा प्रकार आहे.


मुलीला त्रास देण्यासाठी देत होता धमक्या...


मुलीने नकार दिला याचा राग मनात ठेऊन इम्रान ने तिची बदनामी करायला सुरुवात केली आणि तिचे फोटो आणि मोबाईल नंबर सोशल मीडियावर अपलोड केले. पोलीस मुलीवर कारवाई करतील असा तर्क त्याने लावला, मात्र असं काहीच झालं नाही. यानंतर या इम्रानने राजकीय लोकांना फोन करून खंडणी मागायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे, फोनवर धमकी देताना त्या मुलीच्या गाडीत पैसे ठेवा असे तोऱ्यात सांगायचं याचा उद्देश म्हणजे, फक्त आणि फक्त त्या मुलीची बदनामी होईल एवढाच होता. केवळ प्रियसीला त्रास देण्यासाठी इम्रान हे सगळे प्रकार करत होता. याआधी मनसेचे वसंत मोरे प्रकरणात या व्यक्तीला अटक झाली होती. मात्र जामीनावर सुटल्यावर त्याने हेच उद्योग सुरु केले आणि कॉंग्रेसचे अविनाश बागवे आणि भाजपचे महेश लांडगे यांना धमक्या दिल्या त्यामुळे त्याला घोरपडी येथून पुन्हा अटक करण्यात आली आहे.