Bogus School List :  राज्यातील 800 शाळा बोगस (School) असल्याचं शिक्षण विभागाच्या पडताळणीत समोर आलं आहे. त्यापैकी 100 शाळा कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत तर इतर शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यात राज्यातील संलग्न नसलेल्या 329, मान्यता नसलेल्या 390, इरादा पत्र नसलेल्या 366, बंद केलेल्या 100, दंड केलेल्या 89 शाळांचा समावेश आहे. यात 77 बोगस शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या हाती या बोगस शाळांची यादी लागली आहे. तुमचं मूल तर या शाळेत शिकत नाही ना? हे पाहून घ्या...


यात पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ, नाशिक, जळगाव, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या शहरांमधील काही शाळांचा समावेश आहे. या शहरातील शाळांकडे योग्य प्रमाणपत्र नाहीत म्हणून या शाळांना टाळं ठोकण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईतील सर्वाधिक शाळा आहेत. ज्या शाळांकडे शासनाचं कोणतंही कागदपत्र नाहीत, काही शाळांमध्ये फ्रॉड कागदपत्र सापडले आहेत आणि काही शाळांकडे बोर्डाचं संलग्न प्रमाणपत्र नाही आहे या तीन टप्प्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या शाळांना बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यातील 100 शाळांना दंड केला आहे. 100 शाळांना दररोज 10 हजार रुपये एवढी दंडाची रक्कम आहे. 


कोणत्या जिल्ह्यात किती शाळा बंद?


पुणे-5
मुंबई-13
पालघर- 20 
ठाणे-15
रायगड- 1
औरंगाबाद-1
जालना-2
बीड-1
उस्मानाबाद-1
नांदेड-1
नागपूर-10
वर्धा-1
अकोला-1
यवतमाळ-1
नाशिक -1
जळगाव-1
रत्नागिरी -1
सिंधुदुर्ग -1


पुण्यातील बंद शाळा...


विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूल, ताम्हणे वस्ती
ट्विन्सलँड इंग्लिश प्राइमरी स्कूल
लिटिल हार्ट इंग्लिश स्कूल लासुर्णे
ज्ञानराज प्रायमरी स्कूल कासरवाडी
वडगाव शेरी येथील लेडी ताहेरुन्निसा इनामदार मराठी शाळा
इस्रा प्राथमिक विद्यालय


मुंबईतील बंद शाळा...


सरस्वती विद्या मंदिर
श्री एस.के. रॉय प्राथमिक इंग्रजी स्कूल
मा.विद्या मंदिर हायस्कूल
युनायटेड इंग्लिश स्कूल
सरस्वती विद्या मंदिर हिन्दी हायस्कूल
जबीर खान पब्लिक स्कूल
श्री राधा कृष्ण विद्या मंदिर
पांडुरंग विद्यालय, मुंबई
सावित्रीबाई फुले विद्या इंग्रजी स्कूल
शिवम एज्यूकेशनल आणि कल्चरल सोसायटी
 शिवनेरी हिंदी स्कूल
नॅशनल कॉन्व्हेंट स्कूल


पालघरमधील बंद शाळा...


प्रार्थना इंग्रजी शाळा
एफ के इंग्लिश अकॅडमी
सेन्ट थॉमस इंग्लिश स्कूल
मदर तेरेसा इंग्लिश प्रायमरी स्कूल 
 मदर तेरेसा इंग्लिश सेकंडरी स्कूल 
श्रीमती.महाराजी विद्यानिकेतन सेकंडरी स्कूल 
सेन्ट लॉरेन्स इंग्लिश स्कूल
केम्ब्रिज हायस्कूल हिन्दी
केम्ब्रिज हायस्कूल इंग्लिश
ज्युपिटर इंग्लिश स्कूल
ट्विंकल स्कूल
फ्लेमिंगो पब्लिक स्कूल
नवजीवन विद्यामंदिर इंग्लिश प्रायमरी
के आर पब्लिक स्कूल
सेन्ट थॉमस इंग्लिश हायस्कूल
मॅक्स फोर्ट इंग्लिश हायस्कूल
अल-फरकन इंग्लिश स्कूल
 इतिहद् इस्लामिक इंग्लिश स्कूल
अंजुमन खैरुल इस्लाम प्री. उर्दू स्कूल
मध्यमिक विद्यालय कुंजपाडा


ठाण्यातील बंद शाळा..


एकता उर्दू पब्लिक स्कूल, भिवंडी
ए.आर.रेहमान उर्दू प्रीप्रायमरी अॅंड प्रायमरी स्कूल
एचआर मेमोरियल इंग्लिश स्कूल
द लर्निंग हायस्कूल
खान सदरुद्दीन प्रायमरी स्कूल, कारीवली
प्रकाश किड्स स्कूल
हनी- बनी इंग्लिश स्कूल
ब्लॉसम इंग्लिश प्रायमरी स्कूल 
मदर हिरावती सभजीत तिवारी प्रायमरी इंग्लिश स्कूल
गाझ इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ मेन्टली चॅलेंज्ड 
आबाबील पब्लिक स्कूल
चव्हान विद्यामंदिर
पी.एन.बेडेकर विद्यामंदिर
ठाणे आदर्श विद्यालय दिवा इंग्लिश स्कूल
स्टारलेट किंग्डरगार्डन


नागपूरमधील बंद शाळा


सार्थक इंग्लिश स्कूल, गजानन नगर - 
एस के इंटरनॅशनल स्कूल, रावीवनगर
पोलीस पब्लिक स्कूल 
एस जी एम पब्लिक कॉन्वेंट निलडोहा देवी
द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, कोंढाली
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, कॉन्वेंट 
एक्सेल इंटरनॅशनल स्कूल 
द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल दाभा 
एलिझाबेथ कॉन्वेंट सेमीनारी हिल्स 


औरंगाबाद


संत ज्ञानेश्वर विद्यालय, निलोड फाटा 


जालना


बागे गुलशन मदरसा माकताब
मदरसा अरबिया फैजाउलम मंथा 


बीड


दारुल उलुम गौशिया मदरसा तालिमूल कुरा कैज 


उस्मानाबाद


मदरसा जमीया आएशा निसवान गालिब नगर, उस्मानाबाद


नांदेड


मदरसा अंजुमन-ए-इस्लाम अलुवादगाव 


वर्धा


श्री साई कॉन्वेंट, हिंगणघाट 


अकोला  


मॉडर्न अरबी मदरसा, खादान, अकोला


यवतमाळ


मिल्लत मॉडर्न मदरसा अँड इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस 


नाशिक


द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पाथर्डी नाशिक ब्राच नं 74


जळगाव 


गुरुकुलम ग्लोबल स्कूल एमआयडीसी


रत्नागिरी


अलहसनत एज्युकेशन सोसायटी, कोंडवली


सिंधुदुर्ग


विजयदुर्ग इंग्लिश स्कूल


शिक्षणाचा बाजार?


सात शाळांनी सी बी एस ई चे बोगस प्रमाणपत्र मंत्रालयातून मिळवल्याच समोर आलं त्यावेळी बोगस शाळांच्या या प्रकरणाला वाचा तेव्हा फुटली. या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे. त्यानंतर शिक्षण विभागाकडून तातडीने राज्यातील बोगस शाळांची पडताळणी सुरु करण्यात आली.  एकीकडे या बोगस शाळांवर कारवाई करताना या शाळांमधे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येईल असं शिक्षण आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शिक्षण क्षेत्राला आता  व्यवसायाच स्वरुप देखील उरलेलं नसून त्याचा बाजार झाला आहे. या बाजारात शिक्षण संस्थाचालक हे नफा कमावण्यासाठी विद्यार्थ्यांचं आयुष्यही पणाला लावण्यास मागे- पुढे पाहात नाही आहे. त्यामुळे शाळा निवडताना पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.