Pune Crime News : 13 वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार झाल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ माजली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तपास अधिक वेगाने केला. गुरुवारी पुणे पोलिसांकडून संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांतच पुणे पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. ओळख असल्याचा बहाणा करून एका अज्ञात व्यक्तीने पीडित विद्यार्थिनीला ढकलत एका नामांकित शाळेतील बाथरूममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकारानंतर या मुलीने आपल्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांच्या कानावर ही घटना टाकली. मुलीच्या आईला व पोलिसांना बोलावून याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाती तपास अधिक वेगाने केला. त्यानंतर आरोपीचं रेखा चित्र तयार करण्यात आलं.
पुण्यात गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात एका 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटमा शिवाजीनगर परिसरातील गर्ल्स हायस्कूलमध्ये काल (23 मार्च) घडली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी मुलीला जबरदस्तीने टॉयलेटमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले. यानंतर संबंधित मुलीने घडलेला प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला. मग मैत्रिणीने याची माहिती शिक्षकांना दिली. शिक्षकांनी मुलीच्या पालकांना आणि पोलिसांना फोन करुन हा प्रकार कळवला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियांका नरनावरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी शाळेत पोहोचले आणि घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम 376 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचं एक पथक स्थापन करण्यात आलं आहे. तसंच पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी दिली.
'गुड टच, बॅड टच' शिकवल्यानंतर मुलीने बलात्कारी शिक्षकाचं बिंग फोडलं -
दुसरीकडे राजस्थानमध्ये एका आईने 'गुड टच, बॅड टच' शिकवल्याने एका नऊ वर्षाच्या पीडित मुलीने आपल्यावर चार वर्षांपूर्वी झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. महत्त्वाचं म्हणजे तिच्यावर अत्याचार करणारा हा शिक्षक होता. मुलीने दिलेल्या माहितीनंतर बलात्कारी शिक्षकाचं बिंग फुटलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली.