Maharashtra Budget Session : राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज विधानसभेत पुणे जिल्ह्यात (Pune District) मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा सापडल्याबाबत महत्वाची माहिती दिली. सोशल मीडियाचा (Social Media) वापर शस्त्र मागवण्यासाठी होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवरुन (Instagram) ही सर्व हत्यारं मागवण्यात आली होती, अशी माहिती देसाई यांनी विधानसभेत (Maharashtra VidhaSabha) दिली.
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा सापडल्याबाबत आमदार राहुल कुल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना राहुल कुल (Rahul Kool) यांनी सांगितलं की, पुण्यात गावठी 5 पिस्तूल, 19 जिवंत काडतुसं सापडली. हे खूप गंभीर आहे. पाटस आणि दौंड पोलिस स्टेशन देखील प्रलंबित आहेत, हे सुध्दा बघितले पाहिजे, असं कुल म्हणाले.
यावर बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, आठपैकी 6 आरोपी पकडले, जे सध्या बेलवर बाहेर आहेत. परराज्यात 1 टीम पाठवली होती. पण बाकीचे आरोपी आढळले नाहीत. आता पुन्हा टीम पाठवू. इन्स्टाग्रामवरुन ही सर्व हत्यारं मागवण्यात आली होती, अशी माहिती देसाई यांनी विधानसभेत दिली.
वाळू माफियाची तक्रार केली म्हणून हल्ला, एबीपी माझाच्या बातमीनंतर गृहमंत्र्यांकडून कारवाईचं आश्वासन
जळगाव जामोदमध्ये वाळू माफियाची तक्रार केली म्हणून त्याच्यावर हल्ला झाला आणि ही बातमी एबीपी माझाने दाखवली. ही बाब गृहमंत्री यांच्या लक्षात आणून दिली. गृहमंत्री यांनी तत्काळ याबाबात कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. जळगाव जामोद या ठिकाणी वाळू माफियाला वाळू वाहतूक करण्यासाठी विरोध केल्यानंतर एका व्यक्तीस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शंभुराजे देसाई यांनी सांगितलं की, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र या तीनही आरोपींनी कोर्टात जाउन अंतरीम जामीन घेतला आहे. ते रद्द करण्याचा प्रयत्न करत आहोत, असं देसाई म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या
- Beed : 2024 ला नवरा विरुद्ध बायको निवडणूक गाजणार; करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडेंना आव्हान
- Kolhapur By Election : करुणा शर्मा कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात! 'उत्तर'साठी भाजपचा उमेदवारही ठरला
- Beed: धनंजय मुंडे यांचा प्रशासनावर वचक नसल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी वाढून बदनामी होत आहे: भाजप
- तुमच्या कर्तेपणाचे किस्से तुमच्या फेसबुक वॉलपासून ते ईडीपर्यंत जगजाहीर; पंकजा मुंडे यांचे धनंजय मुंडेंना जोरदार प्रत्युत्तर