Pune Koyta gang : मागील काही  (Koyta gang)दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. यामुळे पुणे पोलिसांनी थेट कोयता विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकला आहे. पुण्यातील (Pune Crime News)  भोरी आळी या परिसरात अनेक लहान-मोठे दुकानं आहेत. याच परिसरातील दुकानावर छाटा टाकला आहे आणि  दुकानातून नवीन विक्रीसाठी ठेवलेले 105 कोयते जप्त केले. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 


पुण्यात सर्रास कोयते उगारले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गॅंगची दहशत सर्रास सुरु आहे. शहरातील अनेक मध्यवर्ती तसेच उपनगरात तरुणांकडून भरदिवसा कोयते उगारले जात आहेत. या तरुणांमध्ये अनेक अल्पवयीन तरुण असून गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांमध्ये भीती पसरली आहे. सामान्य नागरिक तसेच व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी लुटण्याचे प्रयत्न देखील या तरुणांकडून केले जात आहेत. मात्र पुणे पोलिसांकडून कुठलीही कठोर कारवाई या तरुणांवर केली जात नसल्याचं चित्र प्रखरतेने जाणवत आहे. शहरात अनेक परिसरात कोयता गॅंगने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे यावर पोलीस कारवाई कधी करणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता. त्यामुळे पोलिसांनी आता अशा घटना रोखण्यासाठी  उपाययोजना करणार आहेत, असं सांगितलं होतं. त्यानुसार पोलीस अॅक्टिव मोडला आले आहेत. 


शहरात अनेक परिसरात धुमाकूळ


कोयता गॅंगने शहरातील अनेक परिसरात धुमाकूळ घातला होता. रोज नव्या परिसरात कोयत्याची भीती दाखवत दहशत निर्माण केली होती. किमान सात ते आठ परिसरात त्यांनी दहशत निर्माण करत अनेकांच्या दुकानांचं नुकसान केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यातील काहींना अटक केली होती. त्यांची भररस्त्याच धिंडदेखील काढली होती. कोयता गॅंगचा मुद्दा विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यानंतर पोलीस अॅक्टीव्ह मोडवर आले होते. यात सर्व वयोगटातील गुन्हेगारांचा समावेश आहे आणि काही सराईत गुन्हेगारदेखील आहेत. 


कोयता गॅंगवरही कठोर कारवाई होणार 

पुणे शहरात सगळीकडे कोयता गॅंगने  धुमाकूळ घातला आहे. याच कोयता गॅंगवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलीस दलातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्‍यांची पोलीस आयुक्तालयात बैठक झाली. या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत. कोयता गॅंगला रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. 


संबंधित बातमी-


Pune Koyta Gang : कोयता गॅंगची दहशत रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा 'मास्टर प्लॅन' तयार