पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (Pune Crime news) पुणे जिल्ह्यात नवीन वर्ष आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात 223 गुन्हे दाखल करत 35 वाहने जप्त करत 1 कोटी रुपयेपेक्षा जास्त मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आलाय. काल गोवा राज्यातून आलेला माल पुण्याच्या बिबवेवाडी मधून जप्त करण्यातआला आहे. यामध्ये तीन आरोपींना अटक केली. नवीन वर्ष असल्याने पोलिसांची दारु अड्ड्यांवर आणि वाहतुकीवर करडी नजर असणार आहे. 


यामध्ये 1250 बॉटल ज्याची किंमत 5 लाख आहे ते जप्त केल्या आहेत.यामध्ये दोन फरारी आरोपीचा तपास सुरू आहे. त्याच बरोबर नवीन वर्ष पार्श्वभूमीवर विशेष पथक 17 पथक 50 अधिकारी 150  कर्मचारी शहर जिल्ह्यात कार्यरथ आहेत. संशय वाहन नागरीक यांच्यावर नजर ठेवणार आहेत. एक दिवसीय परवाने 50 पेक्षा जास्त  देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात हॉटेल पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. 


31 डिसेंबरच्या निमित्ताने अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिस विभागाच्या पथकांचे लक्ष असणार आहे. अवैध दारू विकणाऱ्या वर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची करडी नजर असणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विश्वजित देशमुख यांनी दिली आहे.


पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी - 


एफएलडब्ल्यू-2, उच्च दर्जाची किंवा अतिउच्च दर्जाची, विदेशी मध्य विकणाऱ्या किरकोळ विक्रीच्या दुकानास 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान उघडं ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. एफएल-3 (परवाना कक्ष)च्या मदिरायलायांना पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्रीची मुभा राहील. तर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत दारुच्या दुकानांना मुभा असेल. नववर्षाच्या स्वागतासाठी चालणाऱ्या  थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर विरजण पडू नये म्हणून 31 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत मद्य विक्रीस परवानगी दिली आहे, तर महानगरांमध्ये पहाटे 5 वाजेपर्यंत ही परवानगी आहे. पुणे आणि मुंबईमध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत मद्य विक्री होणार आहे. 


एक दिवसाच्या परवानाची गरज - 


दारू पिण्यासाठी एक दिवसाचा तात्पुरता परवाना आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईत विनापरवाना दारू पिताना कुणी आढळले अथवा दारू पिऊन वाहन चालवताना आढळले तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याला पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे.


इतर महत्वाची बातमी-


Katraj Ghat Accident : कात्रज बोगद्यात पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या, अचानक ब्रेक झाल्याने अपघात, एक महिला जखमी