पुणे: वाघ जेव्हा जंगलात असतो तेव्हा तो राजा असतो, पण डरकाळी फोडणारा वाघ जेव्हा पिंजऱ्यात जातो तेव्हा काळजाला वेदना होतात, महाराष्ट्राच्या विकासाठी गेलेल्या वाघाची अवस्था सर्कशी सारखी झाली आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता टीका केली. महाराष्ट्राचा स्वाभिमान डिवचला जातोय, पण महाराष्टाचे नेते दिल्लीसमोर का उभा राहत नाहीत? असा सवालही त्यांनी विचारला. ते शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये ( Shetkari Akrosh Morcha) बोलत होते.
शेतकरी आक्रोश मोर्चा आजचा तिसरा दिवस आहे. आजच्या तिसऱ्या दिवशी बारामती लोकसभा मतदारसंघातून आक्रोश यात्रा प्रवास करीत आहे. आज बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड इंदापूर तालुक्यात रॅली पार पडल्यानंतर आक्रोश मोर्चा गेल्यानंतर बारामती तालुक्यात प्रवेश केला. अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात अमोल कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चा येणार असल्याने त्याकडे सर्वांचंच लक्ष होतं.
अमोल कोल्हे म्हणाले की, बारामतीत अमोल कोल्हे येणार आणि काय बोलणार याकडं मीडियचे लक्ष लागले होते. सब्र करो, सब्र का फल मिठा होता है. गुडघे टेकवायच की संघर्षं करायचा हा आमच्यासमोर पर्याय होता. आम्ही संघर्ष करायचं ठरवलं.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताने अमोल कोल्हे म्हणाले की, मी पुन्हा येईल असे म्हणाले की अडीच वर्षात परत येता येतं, पण अर्धचं परत येता येतं.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
आक्रोश मोर्चामध्ये बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्या दोन भावांचा सगळ्यात जास्त संबंध इंदापूरशी येतो. श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, राजेंद्र पवार आणि सुनंदा पवार हे या ठिकाणी येत असतात. गेल्या काही दिवसात काही घटना घडल्या म्हणून आक्रोश मोर्चा आम्ही काढला. अमोल कोल्हे ज्या ताकदीने ते लढत आहेत त्याचे कौतुक आहे. पवार साहेब ज्याला मतदान करा म्हणतात, इंदापूरकर त्यालाच मतदान करतात. त्यांचा शब्द कधीही पडू दिला नाही.
साहेबांमुळे माझं आणि दादांचं राजकारणात सॉफ्ट लँडिंग झालं
सुरवातीला प्रफुल्ल पटेल यांनी आग्रह केला आणि मी निवडणुकीच्या रिंगणात आले. साहेबांची मुलगी आणि दादांची बहीण म्हणून मला तुम्ही मला सुरवातीला निवडून दिले. कितीही दूषित वातावरण असले तरी तुम्ही मला तीन वेळा निवडून दिले, सलग 8 वर्ष बारामती हा एक नंबरचा मतदारसंघ आहे. अजित पवारांच्या वडिलांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. साहेबांमुळे दादा आणि मला सॉफ्ट लँडिंग होते. साहेबांनी शून्यातून हे साम्राज्य उभं केलं. जो दिल्लीत मान सन्मान मिळतो तो बारामतीकरांनी निवडून दिल्यामुळे मिळतो. 38 व्या वर्षी आजपर्यंत कुणीही मुख्यमंत्री झाले नाहीत, शरद पवार झाले.
ही बातमी वाचा: