पुणे : पुणे गुन्हे शाखेने ड्रग्सची   (Pune Drugs) आतापर्यंतची

  (Pune Crime News) सर्वात मोठी  (Pune Drug Racket Bust)कारवाई केली आहे. तब्बल 4000 कोटींचं ड्रग्ज (Mephedrone) पुण्यात जप्त करण्यात आलं आहे. याच ड्रग्स रॅकेटच्या मास्टर माईंडचं नाव समोर आलं आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याने नेपाळमार्गे कुवेतला पळ काढल्याचं समोर आलं आहे. संदीप उर्फ सनी धुनिया (Sandip/ Sanny Dhuniya) असं या मास्टरमाईंडचं नाव आहे.  त्याच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट असून त्याला नेपाळमध्ये या प्रकारचा कारखाना उभारायचा होता. मात्र, त्या पूर्वीच त्याच्या पुण्यातील रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने तो नेपाळमार्गे कुवेतला पळाल्याचं समोर आलं आहे. 


कोण आहे संदीप धुनिया ?


पुणे पोलिसांनी आतापर्यंतच सगळ्यात मोठं ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर त्याच्या मास्टरमाईंडचा शोध घेतला. पुणे पोलिसांच्या हाती या मास्टरमाईंडचा म्हणजेच संदीप उर्फ सनी धुनियाचा फोटो हाती लागला आहे. तो मुळचा पाटण्याचा आहे. 2016 मध्ये संदीप धुनियाला महसुल गुप्तचर संचलानालयाने केलेल्या कारवाईत अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून साधारण 350 किलो एमडी ड्रग्स देखील जप्त करण्यात आले होते. ही कारवाई देखील कुरकुंभ एमआयडीसीत करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तो अॅक्टिव्ह असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात या पूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी वैभव माने आणि हैदर या दोघांच्या संपर्कात होते. येरवडा जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा हे रॅकेट सुरु केलं. सध्या सनी त्याच्या कुटुंबियांबरोबर लंडनला राहतो.


नेपाळमार्गे कुवेतला पळाला..


हे रॅकेट पुढे आल्यानंतर सनी धुनिया हा नेपाळमार्गे कुवेतला पळाला आहे. त्याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या टीम्स अॅक्टिव्ह केल्या आहेत. त्याचा फोटो समोर आल्याने तपासालादेखील वेग आला आहे. पुणे पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात लुक आउट नोटिस बजावली असून रेड कॉर्नर नोटिस बजावण्याचे देखील काम सुरू असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. 


आतापर्यंत आठ जणांना अटक 


पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांना अटक केली आहे. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय 40, खडीचे मैदान, सोमवार पेठ),  अजय अमरनाथ करोसीया (वय 35, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय 40, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (वय 46, रा. पिंपळे सौदागर, पुणे), युवराज बब्रुवान भुजबळ (वय 41, रा. गरिबाचा वाडा, महात्मा फुले रोड, डोंबीवली पश्चिम, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. तर दिल्ली येथून दिवेश भुतीया (वय 39) आणि संदीप कुमार (वय 42 , दोघेही रा. दिल्ली) या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर आयुब अकबर मकानदार याला सांगलीतून अटक करण्यात आली आहे.  


इतर महत्वाची बातमी-


Pune Drugs : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचे लंडन कनेक्शन, रेडी टू इट फूड पाकिटांच्या माध्यमातून एमडी ड्रग्जची सेवा लंडनमध्ये