पुणे : ऐन दिवाळीत पुण्यात गाड्या पेटवल्याची (Pune Crime news) घटना घडली आहे. पुण्यातील वारजे भागात असणाऱ्या रामनगर टाकी चौक परीसरात रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकी (vehicle Burn crime in pune) अज्ञातांनी पेटविल्याची धक्कादायक समोर आली आहे. यात गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या तीन दुचाकी पेटवण्यात आल्या तर एका चारचाकी (Car and two Wheeler Vehicle burn) वाहनाची काच फोडून नुकसान केलं आहे. सध्या पुण्यात गाड्या पेटवणारी टोळी सक्रिय झाल्याचं मागील काही घटनांमधून समोर आलं आहे.
दुचाकीच्या लागलेल्या आगीने शेजारील एका रिक्षाचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले. ही घटना गुरूवारी मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास घडली.मिसळलेल्या माहितीनुसार, दुचाकी वरून आलेल्या 2 व्यक्तींनी हा प्रकार केला असावा अशी शक्यता नागरिकांकडून वर्तविली आहे. या घटनेवर योग्य कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात अली असून वारजे पोलीस तपास करत आहेत.
पुण्यात गाड्या पेटवण्याच्या घटनेत वाढ...
पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गॅंगची दहशत सुरु असतानाच गाड्या फोडणारी टोळीदेखील सक्रिय होत असताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी गाड्या फोडण्याच्या घटना समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका व्यक्तीने रागाच्या भरात केलेल्या कृत्याची चर्चा सध्या शहरभर चर्चा झाली होती. या पठ्ठ्याने पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिली म्हणून थेट गाड्याच पेटवल्या होत्या. यामुळे गाड्यांचं नुकसान झालं होतं.
4 दुचाकी, 1 चार चाकी आणि एका रिक्षाला आग लावली होती. यात काही गाड्या जळून खाक झाल्या आहेत तर इतर गाड्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं. टेरेन्स डॉमिनिक जॉन असे या व्यक्तीचे नाव होतं. आरोपी टेरेन्स आणि त्याची पत्नी यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी कोणतेही काम धंदा करत नव्हता म्हणून पत्नीने त्याच्याविरोधात घटस्फोटासाठी अर्ज दिला. पत्नी सोबत राहायचे असल्यामुळे त्याने अनेक वेळा तिला घटस्फोट देऊ नको असे सांगितले तरी सुद्धा त्याच्या पत्नीने अर्ज दाखल केला होता. घटस्फोटाच्या अर्जावरुन चिडलेल्या जॉनने पत्नीची दुचाकी जाळायचे ठरवलं होतं.यावेळी पार्किंगमध्ये असलेल्या इतर दुचाकींसह परिसरातील चारचाकी, रिक्षा आणि इतर दुचाकी यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्या होत्या.
इतर महत्वाची बातमी-
आई अण्णा मला माफ करा, मराठा आरक्षणासाठी नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या