बारामती, पुणे : धनगर समाजाच्या (Dhangar reservation) आरक्षणाची एसटी प्रवर्गातून (ST) अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी बारामतीत आमरण उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे (Chandrakant waghmode) यांना समर्थन देण्यासाठी आज दुपारपर्यंत बारामती बंदच आयोजन करण्यात आलं. या बंदला बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी बारामती शहरातील प्रमुख रस्त्यांवरून येळकोट येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाच अशा घोषणा देत रॅलीत सहभाग घेतला. तसेच काही काळ प्रशासकीय इमारतीच्या बाहेर रास्तारोको देखील केला.
मागील काही दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी चंद्रकांत वाघमोडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला बारामतीतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी सगळे समर्थक रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी घोषणाबाजी करत रस्ता रोखून धरला होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांनी बारामतीत यावं किंवा प्रतिनिधी पाठवावा उपोषणकर्ते वाघमोडे यांची मागणी
धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी चंद्रकांत वाघमोडे उपोषणाला बसलेले आहेत. बारामतीतील प्रशासकीय भावना बाहेर चंद्रकांत वाघमोडे यांचं उपोषण सुरू आहे. आजचा त्यांचा उपोषणाचा आठवा दिवस आहे. काल पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी भेट दिली. उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे येत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा चंद्रकांत वाघमोडे यांनी घेतला.
सरकारने 50 दिवसात काय केलं?, हे मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे शासनाचे प्रतिनिधी याचे उत्तर देऊ शकणार नाहीत. याचे उत्तर हे मुख्यमंत्री देऊ शकतील म्हणून मुख्यमंत्र्यांनी इथे यावं किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे यांना पाठवावं, अशी मागणी उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे निघून गेले होते. दोन दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन तुमचा विषय मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करते असा आश्वासन दिल होतं. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे उपोषण स्थळी येऊन मुख्यमंत्री यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. तसेच उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांच्याशी जिल्हाधिकारी यांचे बोलणे करून दिले त्यानंतर काल जिल्हाधिकारी या ठिकाणी भेटीसाठी आले होते.
इतर महत्वाची बातमी-
अद्वय हिरेंची अटक पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा भाग, दादा भुसेंचं षडयंत्र; संजय राऊतांनी थेट फटकारलं!