पुणे : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार ॲक्शन मोडवर आले आहे. पुणे शहरातील नामचीन गुंडांची ओळख परेड काढण्य़ात आली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे, निरेश घायवळसह पुण्यातल्या इतर गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांची पोलिसांनी ओळख परेड काढलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच पुण्यातील नामचीन गुंडांना पहिलाच दणका दिलाय. पुणे पोलीस आयुक्तालयात जवळपास 200 ते 300 गुन्हेगार यांची परेड करत आयुक्तांकडून सर्वांना तंबी देण्यात आली.पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात सर्व टोळ्यांना समोरासमोर आणून अशा प्रकारे दम भरण्याची ही पहिलीच वेळ आहे.


पुणे शहरातील अनेक नामचीन गुंडांची सध्या दहशत दिसत आहे. त्यात पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्यादेखील टोळीयुद्धात करण्यात आली. शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता नवनियुक्त पोलीस आयुक्त अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी थेट पोलीस आयुक्तालयात साधारण 200 ते 300 अट्टल गुन्हेगारांची परडे काढली आहे आणि या गुन्हेगारांना चांगलाच दणकादेखील दिला आहे. 


यात गजानन मारणे, निलेश घायवळ यासह पुण्यातील इतर गुंडांच्या टोळीतील प्रमुख मोरख्यासह इतर सदस्यांचा या परेडमध्ये समावेश होता. पुण्यात सध्या अनेक गुंडांच्या टोळ्या आहेत. त्यात महत्वाचं म्हणजे आता पुण्यात रोज एक नवी टोळी तयार होताना दिसत आहे. त्यात कोयता गॅंग, गाडी फोडून दहशत पसरवणाऱ्या गॅंगचादेखील समावेश आहे. लहान मोठ्या सगळ्याच टोळ्यांना तंबी देण्यासाठी पोलीस आयुक्तांनी थेट आयुक्तालयातच परेड काढली. 


पुण्याचे नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार हे अॅक्शन मोडवर आले आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी हेल्मट सक्तीवर नजर ठेवणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर बैठकीत पुण्यातील सगळ्यात पोलीसांना विविध सूचनादेखील केल्या होत्या. त्यानंतर शहरातील अट्टल आणि गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या शिवाय यापुढे त्यांच्याकडून कोणताही गुन्हा होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. आपल्या परिसरातील फाईलवरचे गुन्हेगार ओळखून त्यांचा योग्य तो बंदोबस्त करा, असंही ते म्हणाले होते. 


या सगळ्यानंतर आज त्यांनीच सगळ्या गुन्हेगारांना दणका दिल्याचं पाहायला मिळालं. अमितेश कुमार हे नागपूरचे आयुक्त होते. त्यावेळी ते नागपूर शहराच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यात यशस्वी झाले होते. आता ते पुण्यातील गुन्हेगारी नष्ट करण्याच्या किंवा आळा घालण्याच्या तयारीत दिसत आहे. त्यांनी आल्यावर काहीच दिवसांत गुन्हेगारांची परेड काढली आहे.


इतर महत्वाची बातमी-


Sant Asaram Bapu Health Update : आसाराम बापू यांची प्रकृती गंभीर; 13 जानेवारीपासून जोधपूरमध्ये उपचार सुरू