Asaram Bapu Health Update : आसाराम बापू याची प्रकृती(Asaram bapu) गंभीर आहे. त्यांच्यावर 13 जानेवारीपासून रुग्णालयात उपचार सुरू जोधपूर येथील AIIMC मधे आसाराम बापूवर उपचार केले जात आहेत योग वेदांत समितीने आज पत्रकार परिषद घेत दिली माहितीते सध्या कार्डियाक ICU मध्ये असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
तुरुंगात जाण्यापूर्वी वयाच्या 74 व्या वर्षी बापू आसाराम बापूंना केवळ ट्रायजेमिनल न्युराल्जिया आणि पाठदुखीचा त्रास होत होता.आता वयाच्या 86 व्या वर्षी ते हृदयविकार, प्रोस्टेट वाढणे, संधिवात आणि अशक्तपणा नवीन आजारांनी ग्रासले आहेत. एम्सच्या अहवालानुसार, त्याच्या हृदयात 3 गंभीर ब्लॉकेज आहेत (99%, 90% आणि 75%). तसेच हिमोग्लोबिनची पातळी सतत घसरत असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत आहे. त्यांची गंभीर शारीरिक स्थिती पाहता पॅरोलसाठी नुकताच दाखल केलेला अर्ज आजाराच्या तीव्रतेकडे दुर्लक्ष करून रद्द करण्यात आला. आसाराम बापूंना तणावमुक्त वातावरणात अनुकूल, उत्तम आणि त्वरित योग्य उपचार मिळावेत, अशी मागणी आशाराम आश्रम अहमदाबाद सत्संग वक्ता रामानंद आणि महिला उत्थान मंडल अहमदाबाद सत्संग वक्ता साधवी रेखा बहन यांनी केली.
आसाराम बापुंना योग्य उपचार मिळत नाहीये- श्री रामानंद यांचा आरोप
बापू आशारामजींनी आपले संपूर्ण आयुष्य सनातन धर्माच्या प्रचारासाठी आणि राष्ट्राच्या उत्थानासाठी वाहून घेतले. जात, धर्म, पंथ, सांप्रदाय असा कोणताही भेदभाव न करता त्यांच्या विविध परोपकारी सेवेचा लाभ कोट्यवधी लोकांनी आजवर घेतला. जनसामान्यांची प्रचंड आस्था, श्रद्धा आणि प्रार्थना बापू आशारामजी यांच्या पाठीशी आहे. सद्यस्थिती अनेक आजारांनी ग्रस्त असताना त्यांना अनुकूल, उत्तम व त्वरित योग्य उपचार मिळावेत अपेक्षित होते पण तसे होताना दिसत नाही. खरे तर बापुंच्या खटल्यातील वास्तव तथ्ये आणि पुरावे पाहता, त्यांना निर्दोष सोडले पाहिजे असे अनेक न्यायशास्त्रज्ञांसह आद्य शंकराचार्य, साधू - संत आणि आमच्या सर्व साधकांची मागणी असल्याचे मत श्री रामानंद यांनी व्यक्त केले.
बापू आशारामजी आश्रमाच्या आवाहनावरून हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारशी - सर्व धर्माच्या लोकांनी ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ मनापासून स्वीकारला आहे. संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातही भारतीय परंपरेचा पुनर्जागरण करण्यासाठी आणि मुलांना संस्कारांचे संस्कार करण्यासाठी 14 फेब्रुवारीला मातृ-मातृत्व दिन करा, असंही आवाहन त्यांनी केलं आहे.
इतर महत्वाची बातमी-