पुणे: मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या गुन्ह्यांच्या घटनांनी पुणे शहर हादरलं आहे. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी वाद झाला, त्यानंतर आपल्या भावाच्या पत्नीची खून केला ती बेशुध्द अवस्थेत सापडल्याचं नाटक करत रूग्णालयात दाखल केलं पण, शवविच्छेदन केल्यानंतर हा आकस्मिक मृत्यू नसून खून (Pune Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यातील केशवनगर परिसरीतल ही घटना आहे. जेवण बनवण्यावरून किरकोळ वाद झाला. या वादाचं रूपांतर रागात झालं आणि सख्ख्या दिराने झोपेत असलेल्या भावजयच्या तोंडावर उशी दाबून तिचा खून (Pune Crime News) केला. भाऊ घरात नसताना ही सर्व घटना घडली आहे. भावजयचा झोपेतच बेशुद्ध पडल्याचा बनाव करत दिराने मयत झालेल्या भावजयीला रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथील डॉक्टरांनी भावजय कविताला मृत (Pune Crime News) घोषित केलं.
शवविच्छेदन केल्यानंतर हा आकस्मिक मृत्यू नसून खून (Pune Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी केशवनगर परिसरात घडली आहे. कविता नागराज गडदर असे खून (Pune Crime News) झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कविता नागराज गडदरचा दीर मल्लिकार्जुन शरणाप्पा गडदर (वय 35) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, गडदर कुंटुब हे मूळचे कर्नाटकचे आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यात केशवनगर परिसरात राहतात. आरोपी मल्लिकार्जुन हा त्याच्या भावाच्या घरी राहायला होता. तो काही कामधंदा करत नव्हता.त्याचबरोबर त्याला दारू पिण्याचं व्यसन देखील होतं. दारू पिण्यावरून मल्लिकार्जुन आणि मयत कविता यांच्यात यापूर्वी भांडणं (Pune Crime News) झाली होती. ही घटना घडली त्या दिवशी आरोपीचा मोठा भाऊ आणि मयत कविताचा पती त्यांच्या मूळ गावी कर्नाटकला गेला होता. घरी आरोपी शरणाप्पा, मयत कविता आणि त्यांची दोन मुले होते. आरोपी शरणाप्पा आणि मयत कविता यांच्यात भांडण झालं होतं. आरोपीने कविताला शिवीगाळ केली, त्यानंतर कविताने शरणाप्पाच्या कानाखाली मारली. याचा राग मनात धरून शरणाप्पा गडदरे यानी कविताचा खून (Pune Crime News) केला. त्यानंतर ती बेशुध्द सापडल्याचा बनाव केला.
भांडण झाल्यानंतर आणि कविताने शरणाप्पाच्या कानाखाली मारल्यानंतर तो बाहेर गेला. काही वेळाने तो घरी परतला. घरी आल्यानंतर तो कविता झोपण्याची वाट पाहू लागला. कविता आणि त्यांचा लहान मुलगा दोघे घरात झोपले होते. तर छोटी मुलगी खेळत होती. आरोपीने मुलीला बाहेर खेळण्यासाठी पाठवलं आणि झोपेत असलेल्या कविता गडदरे यांच्या चेहऱ्यावर उशी दाबून खून केला. त्यानंतर काही घडलंच नाही अशा स्थितीत तो घरात बसून होता. काही वेळाने त्याने कविता घरात बेशुद्ध अवस्थेत सापडली असा बनाव रचत जवळच्या रुग्णालयात तिला दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी कविताला मृत घोषित केले.
कविताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला. पोस्टमार्टममध्ये कविताचा खून झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी शरणाप्पा गडदरेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानी खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.