Pune Crime News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूर, अकोला, पुणे, या घटनानंतर आता दौंड तालुक्यातील मळद गावात देखील शालेय विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक शोषण (Pune Crime News) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दौंड तालुक्यातील मळदमधील एका विद्यालयातील एका शिक्षकाकडून 7 वी, 8 वी, 9 वी मधील शिकत असणाऱ्या 3 ते 4 विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून अत्याचार (Pune Crime News) केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून विद्यालयात जाऊन गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू आहे.


शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षकाने व्हाँट्सअप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करून अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल आणि अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पालकांना समजल्यानंतर शाळेमध्ये जाऊन संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. याप्रकरणी पुणे ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे चौकशी करीत असून संबंधित शिक्षकाचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांकडून विद्यालयात चौकशी सुरू आहे.


पुण्यातील अत्याचाराची गंभीर घटना 5 महिन्यांनी उघडकीस


पुण्यात अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याची घटना समोर आली आहे, या प्रकारानंतर मित्रांसह पिडितेच्या मैत्रिणी विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या मदतीने तिच्याच 2 मित्रांनी लैंगिक अत्याचार  (Pune Crime News) केल्याचा प्रकार समोर आला आहे. अत्याचार करणारे अल्पवयीन तरुण पोलिसांच्या ताब्यात आहेत.अल्पवयीन तरुणीला मैत्रिणीनेच दारू पाजली त्यानंतर ती नशेत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार  (Pune Crime News) केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यात एप्रिल महिन्यात घडलेली ही घटना आता उघडकीस आली आहे.


पुण्यातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार


बदलापूर,अकोला पाठोपाठ पुण्यात देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे, पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा (Pune Crime News) प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडला आहे. पीडित मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील १९ वर्षीय आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर आपली चिमुरडी मुलं शाळेत देखील सुरक्षित नसल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.