पुणे : पुण्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव अहुजा या प्रकरणाच्या तपासातील अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) पंचतारांकीत हॉटेलमधील एका पबमधील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी (Pune Police) मिळवलं आहे. घटनेच्या आधी गौरव आहुजा ज्या पबमध्ये गेला होता, त्या ठिकाणचे फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील मुंढवा रोडवर असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गौरव आहुजा होता, त्याच्यासोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाल देखील होता. गौरव हा त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याच्यासोबत त्या पबमध्ये गेले असल्याची माहिती समोर आली आहे.
गौरव आहुजाने शास्त्रीनगर भागामध्ये लघुशंका करत अश्लील कृत्य केलं होतं. त्याला पुन्हा एकदा काल पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंतचा तपासामध्ये पोलीस गौरव अहुजाला त्या ठिकाणी घेऊन गेले होते. ज्या ठिकाणी त्याने अश्लील कृत्य केलं होतं. त्या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन गेले होते. त्याचबरोबर गौरव आहुजा याने पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन तिथे बसून तो दारू प्यायला होता, त्याचा देखील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हे हॉटेल मुंढवा परिसरातील आहे, पोलिसांनी त्याची बीएमडब्ल्यू कार ताब्यात घेतलेली आहे. ही कार त्याने कोल्हापूरमधील एका पेट्रोल पंपावरील पार्किंगमध्ये लावली होती. त्याची नंबर प्लेट लपवण्यात आलेली आहे. या प्रकरणासंबंधीचे जे पुरावे आहेतस त्यावरती त्याने छेडछाड केलेले आहे, असं पोलिसांनी काल कोर्टामध्ये सांगितलेला आहे. आज पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. आज त्याचे मेडिकल रिपोर्ट देखील येतील त्याने फक्त मद्य प्राशन केलं होतं की, आणखी काही ड्रग्ज वगैरे सेवन केलं होतं, ते देखील पोलिसांना तपासायचा आहे. ( Pune Crime News)
नेमकं काय प्रकरण?
पुणे शहरातील एका गजबजलेल्या चौकामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध आपली बीएमडब्ल्यू कार उभी करून तरूणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरूणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची घटना समोर आली, त्यानंतर एका व्यक्तीने त्या तरूणाला जाब विचारल्यानंतर त्याने पुन्हा एकदा अश्लील चाळे केले आणि भरधाव वेगात आपली कार पळवली. ही संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.