Pune Crime Update:पुण्यात वाघोली परिसरामध्ये बीएमडब्ल्यू कारने जात असताना,एका तरुणाने येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवली, त्यानंतर रस्त्याच्या कडेला लघुशंका केल्याचा व्हिडीओ शनिवारी (दि. 8) व्हायरल झाला होता. त्यानंतर शहरात संतप्त पडसाद उमटले.पुण्यातील गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजासह त्याच्या मित्राला कराड पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला न्यायालयाने एका दिवसाच्या कोठडीची शिक्षा सुनावली होती .आज गौरव अहुजाला (Gaurav Ahuja) पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आला होतं . या आरोपींची बीएमडब्ल्यू गाडी जप्त करण्यात आल्यानंतर आता मोबाईल जप्तीसाठी आणखी एक दिवस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील करताहेत. यावर गौरव अहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याच्या वकिलांनी विरोध केला असून 'Unreasonable' ग्राऊंडवर पोलिस कोठडी मागत असल्याचा प्रतिवाद त्यांनी केलाय.

 पुण्यातील शास्त्रीनगरमधील अश्लील चाळे प्रकरणी  गौरव आहुजाला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवालला अटक केल्यानंतर न्यायालयानं एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे शहरातील शास्त्री चौकामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध BMW कार उभी करून गौरव आहुजाने लघुशंका केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनीआहुजासह ओसवालला ताब्यात घेतलं होतं. 

सुनावणीत काय वाद प्रतिवाद झाले?

सरकारी वकिलांनी सांगितलं की, आरोपी ज्या BMW गाडीत होते, ती पोलिसांनी जप्त केली आहे, मात्र नंबर प्लेट्स आधीच काढून ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय, गौरव आहुजाचा मोबाईल पोलिसांनी अद्याप जप्त केलेला नाही, जो तपासासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळेच दोन्ही आरोपींना २ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, असा आग्रह त्यांनी धरला.

मात्र, आरोपींच्या वकिलांनी याला तीव्र आक्षेप घेतला. भाग्येश ओसवालच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, त्यांनी पोलिसांना आरोपींचे कपडे आणि मोबाईल आधीच दिले आहेत, त्यामुळे पोलिस कोठडीची गरजच नाही. तर गौरव आहुजाच्या वकिलांनी पोलिसांची मागणीच अवाजवी असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितलं की, काल पोलिसांनी कोठडी मागितली तेव्हा ती न्यायालयाने मंजूर केली होती, मात्र आता नव्याने कोठडी मागण्यासाठी कोणतंही ठोस कारण नाही.

हेही वाचा:

Maharashtra Budget 2025 Crime: राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अर्थसंकल्पात काय? अर्थमंत्री अजित पवारांच्या महत्त्वाच्या 12 घोषणा, वाचा