पुणे : पुण्यात बापाच्या नात्याला काळीमा फासणारी (Pune Crime News) घटना समोर आली आहे. पोटच्या 15 वर्षीय मुलीने आश्लील चाळे करण्यास विरोध केल्याने बापाने तिला थेट गरम इस्त्रीचे चटके दिल्याची संतापदायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 43 वर्षीय वडिलावर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
43 वर्षीय वडील आपल्याच मुलीसोबत शाळेत जाताना आश्लील चाळे करत होते. मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. मात्र एक दिवस मुलीने वडिलांना हा प्रकार करण्यास नकार दिला आणि या सगळ्याला वैतागून वडिलांनी मुलीच्या गालाला थेट इस्त्रीचे चटके दिले. या सगळ्यादरम्यान मुलीने अनेकदा प्रतिकार करण्यास नका दिला. त्यावेळी वडील तिला शिवीगाळ करत होते. त्या मुलीने एकदा वडिलांना ढकलून देण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र या सगळ्याचा प्रतिकार केल्यामुळे नराधम बापाने मुलीला आयुष्यभराची शिक्षा दिली आहे. तिच्या गालाला मोठी जखमदेखील झाली आहे.
पुण्यात अत्याचाराच्या घटनेत चांगलीच वाढ
पुण्यात अत्याचाराच्या घटनेत चांगलीच वाढ झाली आहे. त्यात कुटुंबियांकडूनच अत्याचार झाल्याच्या घटनांचा देखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वी आजोबा, चुलता आणि वडिलांकडून 17 वर्षीय मुलीवर चार वर्ष लैंगिक अत्याचार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कॉलेजमधील एका समुपदेशनाच्या तासाच्यावेळी ही घटना समोर आली होती. ही घटना ऐकून समुपदेशकांना धक्का बसला होता. या प्रकरणी 49 वर्षीय वडिलांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली होती. मुलीचे आईवडील पुण्यात मोलमजूरी करतात. घरात परिस्थिती नीट नसल्याने लहानपणी तिला उत्तर प्रदेशातील गावाकडे रहायला पाठवलं होतं. 2016 ते 18 ही दोन वर्ष मुली उत्तर प्रदेशात रहायला होती. याच दरम्यान 33 वर्षीय चुलत्याने जबरदस्ती करुन तिच्यावर किमान वर्षभर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर तिच्या आजोबांनी देखील तिचं चुंबन घेऊन वारंवार अश्लिल चाळे करत होते. या संदर्भात तिने अनेकदा विरोध केला होता. मात्र दोघेही वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते.
विश्वास नेमका कोणावर ठेवावा?
या अशा प्रकारच्या घटना समोर आल्या की विश्वास नेमका कोणावर ठेवायचा?, असा प्रश्न निर्माण होतो. या घटनांमुळे नात्यांवरचा विश्वास उडत आहे. त्यामुळे मुली घरातही सुरक्षित नसल्याचं समोर येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Pune Crime News : लष्करी अधिकारी म्हणून वावरत असलेला तरुण पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद