Pune Crime : परराज्यातून नोकरीसाठी (Job) बोलावून एका तरुणीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 6 मे ते 6 जून या महिन्याभरात पुणे (Pune) आणि पिंपरीत (Pimpri Chinchwad) घडल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्यानुसार चौघांविरोधात पिंपरीत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. 


काय आहे प्रकरण?


बी.कॉमचे शिक्षण झालेली ही 28 वर्षीय तरुणी मूळची पश्चिम बंगालची (West Bengal) आहे.  पीडित तरुणी कामाच्या शोधात होती. ऑनलाईन वेबसाईटवरुन तिला पुण्यातील एका महिलेचा नंबर मिळाला. महिलेने तरुणीला बँकेत नोकरीसाठी इंटरव्यू असल्याचे सांगून पुण्यात येण्यास सांगितलं. त्यानंतर बँकेत नोकरीसाठी वेळ लागणार असल्याचे सांगून इतर नोकरीसाठी अर्जुन ठाकरे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. यानंतर अर्जुन ठाकरेने पीडितेला पुण्यातील अरोरा टॉवरमध्ये बोलावले.  महेश्वरी रेड्डीच्या कार्यालयात तिला नोकरी मिळवून दिली. तिथे ठाकरे याने चिरागउद्दीन शेख, महिला आरोपी आणि महेश्‍वरी रेड्डी यांच्याशी पीडित तरुणीची ओळख करुन दिली. त्याचवेळी ठाकरेने तरुणीच्या पाठीवर हात फिवरत, ही तुम्हाला खुश ठेवेल असं म्हणाला. त्या बदल्यात रेड्डीने ठाकूरला पंधरा हजार रुपये देऊ केले. मग त्यानंतर रेड्डीने संधी मिळेल तेव्हा पीडितेशी जवळीक साधण्याचे प्रयत्न केले. तसंच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. कार्यालयाचे कक्ष, बाथरुम असं मिळेल त्याठिकाणी रेड्डी अश्लील चाळे करत होता. कार्यालयातील एक महिला आणि तिचा पती चिरागउद्दीन शेख हे रेड्डीला साथ द्यायचे. आम्ही अनेक मुली रेड्डीला दिल्या आहेत. तू देखील त्यांना खूश कर, असं महिला आरोपीने पीडित तरुणीला सांगितलं. तर तिचा पती चिरागउद्दीनने पिस्तुलचा धाक दाखवून पीडित तरुणीला धमकावलं.


चार जणांविरोधात गुन्हा


केवळ नोकरीच्या उद्देशाने पुण्यात आलेल्या या पीडित तरुणीने कशीबशी यातून सुटका करुन घेतली आणि स्वतःला सावरत पिंपरी पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर अर्जुन ठाकरे, महेश्वरी रेड्डीसह शेख पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार पुण्यात घडल्याने लष्कर पोलिसांकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. आरोपींविरोधात लवकरात लवकर आणि कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पीडित तरुणीने केली आहे.


हेही वाचा


Pune Crime News : सामूहिक अत्याचाराने पुणे हादरलं! तीन नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 'गुड टच बॅड टच' उपक्रमात मुलीने शिक्षकांना सांगितला प्रकार